विद्यापीठ परिसरात दोन दुचाकी समोरासमोर धडकून अपघात, दुचाकीस्वार किरकोळ जखमी

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्यापीठ परिसरात दोन दुचाकी समोरासमोर धडकून अपघात, दुचाकीस्वार किरकोळ जखमी

 औरंगाबाद:  शिलवंत गोपणारायन , आज दि.११ जुलै २०२१  दुपारी ४:३० च्या सुमारास बुलेट आणि प्यशन प्लस या दोन दुचाकी समोरासमोर धडकून मोठा अनर्थ होतांना वाचला, मात्र दोनी दुचाकींचा नुकसान झाले आहे, बुलेटस्वार (MH29 BB3848)  स्वप्नील हनुमान साळवे याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्वप्नील हा  रा.परभणी चा असून आपल्या भावाला भेटायला विद्यापीठ परिसरात आला असता त्यांच्या बुलेट ला समोरून येणाऱ्या MH20 CC 1039 या दुचाकीस्वार मात्र तिथून माहिती न देता निघून गेला आहे,  प्यशन प्लस ने जोरदार धडक दिली यामध्ये प्यशन प्लस चे मोठे नुकसान झाले असून बुलेट चे सुद्धा कमीअधिक नुकसान झाल्याचे दिसते आहे, अशी माहिती बेगमपुरा पोलीस स्टेशन चे पो.हे.कॉ. राजकुमार जाधव यांनी दिली.हल्ली अलीकडच्या काळात  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पर्यटक आणि इंटरनेट वर व्हिडिओ टाकून लाईक्स मिळवण्यासाठी येणाऱ्या फेसबुक प्रेमींचा सुळसुळाट पाहायला मिळतो आहे, त्यांना विद्यापीठ म्हणजे फक्त एक पर्यटन स्थळ आहे असे वाटते. परंतु विद्यापीठ प्रशासनाने या अश्या नेटप्रेमींना विद्यापीठात येण्यास मज्जाव करायला हवा अन्यथा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवाला असल्या अपघातामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे अपघात विद्यापीठ परिसरात नेहमीच होत असतात या अपघातांना आळा बसवणे गरजेचे आहे. जे ने करून विद्यार्थी सुरक्षित राहतील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या