मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पाठ थोपाटणा-या आंबेडकरवाद्यांनो, आधी याचे उत्तर द्या ; प्रविण जाधव

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पाठ थोपाटणा-या आंबेडकरवाद्यांनो, आधी याचे उत्तर द्या ; प्रविण जाधव

भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री नारायण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वादामध्ये आंबेडकरवाद्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या भुमिकेवर राजकीय अभ्यासक प्रविण जाधव यांचा लेख....

 


                       जेंव्हा पासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच महाआघाडी सरकार आलाय तेंव्हापासून स्वतः ला आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या लोकांना उद्धव ठाकरे सरकारचा असा पुळका आलेला आहे की, भाजप विरुद्ध काहीही म्हटल किंवा वाद झाला तर हे लोक टाळ्या वाजवण्याचे काम करतात. शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस कधीपासून आंबेडकरी मागासवर्गीय प्रवर्गाचे निर्णय घेऊ लागले आहेत? 

                          राणे उद्धव ठाकरे वादात so called आंबेडकरी लोकांच्या माकडउड्या " बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना " अशी आहे. महाआघाडी सरकार स्थापन झाल्यापासून कोणते निर्णय मागासवर्गीय प्रवर्गासाठी घेतलेत? शिष्यवृत्तीचा प्रश्न अजून निकाली नाही, परदेश  उच्चशिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली नाही, ना न्यायालयात पदोन्नती आरक्षणात सरकारकडून ना कोणता वकील आहे ना कोणता निर्णय, दलित आत्याचारावर सरकारची उदासीन भूमिका अशा कितीतरी गोष्टी आहेत की तुमच्या हिताच्या नाहित तरी उगाच टाळ्या वाजवता? भाजप उघड मनुवादी आहे पण शिवसेना या तिघाडी सरकारची खोटी secular भूमिका आहे.


                            केंद्रीय मंत्री नारायण राणे जे वक्तव्य केले त्यात काहीही चूक मला वाटत नाही, ज्याला देशाचा कितवा स्वातंत्र्य दिन माहीत नाही, ज्याला देशाच्या राष्ट्रध्वजाच्यावर दुसरा ध्वज मोठा लावावा लागतो त्या मुख्यमंत्री बद्दल केलेलं विधानात काहीही नवल नाही आणि नारायण राणेला ज्या पद्धतीने अटक केली ती सुशासन कायदा म्हणने म्हणजे मोठा विनोद आहे. हाच निकष इतर दलित अत्याचार अटक दाखवण्यात का मागे थांबतो हेच कळत नाही. उद्धव ठाकरेचे वडील बाळ ठाकरे यांची भाषा कशी होती ही सगळ्यांना माहीत आहे. अनेक लोकांचे दलित अत्याचारात पँथरच्या वरळी दंगली पासून नामांतर काळात शिवसेनेने केलेला तांडव ते रमाबाई आंबेडकर हत्याकांडात बाळ ठाकरे शिवसेनेची भूमिका तपासा. अनेक स्वतःला पुरोगामी म्हणविणारे आज उद्धव ठाकरेची पाठ थोपटत आहेत आणि त्यातल्या त्यात आंबेडकरवादी म्हणविणारे उथळ आहेत.


                            हेच उद्धव ठाकरे भीमा कोरेगाव दंगलीचा आतंकवादी संभाजी भिडेला भेटतात तेंव्हा का मूग गिळतात? जिथे तुम्हाला काडीची किंमत नाही ना कोणत्या प्रकरणी साथ नसते त्या लोकांसाठी फुकट माकडचाळे करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे स्वतः ला आंबेडकरवादी म्हणविणाऱ्यांनी फुकटचे धंदे बंद करावेत अनेक गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्यांना कडू लागलं असेल तर लागू द्या काहीही पर्वा नाही, पण ज्यांच्यासाठी तुम्ही फुकट टाळ्या वाजवता ते तुम्हाला नेहमीच लाथ घालत असतात.

- प्रविण जाधव, बुलढाणा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या