भारिप बहुजन महासंघाच्या "माजी कॅबिनेट मंत्र्या"चे दुःखद निधन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भारिप बहुजन महासंघाच्या "माजी कॅबिनेट मंत्र्या"चे दुःखद निधन

लिलावती रुग्णालयामध्ये होते उपचार सुरु


पवन गवई/वंचितनामा न्यूज नेटवर्क 

अकोला/प्रतिनिधी - बहुजन समाजाचे नेते भारिप बहुजन महासंघाचे माजी आमदार कॅबिनेट मंत्री मखराम पवार यांचे मुंबई येथील लिलावती रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाले.


मखराम पवार यांनी बहुजन महासंघ हि सामाजिक संघटना स्थापन केली होती. त्यानी या संघटनेपासुन आपली राजकीय वाटचाल सुरु केली होती. पुढे २१ मार्च १९९३ ला शेगाव येथे निळु फुले, राम नगरकर यांच्या उपस्थितीत अ‍ॅड.  प्रकाश आंबेडकर यांच्या ‘भारिप’ आणि ‘बहुजन महासंघ’चे संयुक्त अधिवेशन झाले‌. या अधिवेशनात मखराम पवार यांनी आपली बहुजन महासंघ हि संघटना ‘भारिप’ मध्ये विलीन केली. अन् पुढे भारिपचा नामविस्तार ‘भारिप बहुजन महासंघ’ असा झाला.


मखराम पवार हे भारिप बहुजन महासंघ या पक्षावरच पहिल्यांदा मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणुन निवडुन आले. त्यानंतर १९९९ ते २००४ या कार्यकाळात विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भारिप बहुजन महासंघाच्या वाट्याला दोन कॅबिनेट तर एक राज्यमंत्री पद आले होते. त्यामध्येच एक कॅबिनेट मंत्री म्हणुन मखराम पवार यांची वर्णी लागली होती.


त्यानंतर त्यांनी काही कारणास्तव भारिप बहुजन महासंघामधुन आधी काँग्रेस मध्ये त्यानंतर २००९ मध्ये भारतीय जनता पार्टी आणि पुन्हा २०१३ मध्ये काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. दरम्यानच्या काळात अकोला जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत मखराम पवार यांचे मुलगा सतिश मखराम पवार यांनी जांब वसु जि.प.सर्कल मधून भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. त्यांचा त्यांचे कुटुंब सद्या वंचित बहुजन आघाडीसोबत काम करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या