Dr.BAMU | पीएच.डी. मौखिक परीक्षेच्या यादीमध्ये ‘जाती’चा उल्लेख ; विद्यार्थी संघटना आक्रमक

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

Dr.BAMU | पीएच.डी. मौखिक परीक्षेच्या यादीमध्ये ‘जाती’चा उल्लेख ; विद्यार्थी संघटना आक्रमक

सोशल 24 नेटवर्क

औरंगाबाद/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवर पीएचडी मौखिक परीक्षेसंदर्भातील यादी काल (दि. 14 सप्टेंबर रोजी) प्रसिद्ध केली. या यादीमध्य विद्यार्थ्यांच्या ‘जात आणि प्रवर्गाचा’ उल्लेख असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या संतापजनक प्रकरणाने विद्यापीठातील विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या, परिणामी विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केलेली यादी वेबसाईटवरून तात्काळ हटवली असून आरआरसी संदर्भात लवकरच नियोजन करण्यात येणार असल्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. 



                    या संदर्भात डॉ. आंबेडकर टीचर्स असोसिएशनचे प्रमुख डॉ. किशोर वाघ यांनी 'सोशल 24 नेटवर्क'शी बोलतांना सांगीतले की, आजपर्यंत विद्यापीठाच्या पीएचडी मौखिक परीक्षेसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर जात/प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये विशिष्ट प्रवर्गासाठी विशिष्ट तारखा देण्यात आल्या आहेत. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या कृत्यामुळे मुलाखत घेणा-या तज्ज्ञांना मुलाखतीपूर्वीच संशोधक विद्यार्थ्याची जात व प्रवर्ग माहिती झाला असता त्यामुळे त्याला गुण देतांना भेदभाव होण्याची शक्यता असल्यामुळे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम, पॅंथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे आणि काही  विद्यार्थी संघटनांच्या प्रमुखांनी एकत्रितपणे मा. कुलगुरूंशी चर्चा केली. परिणामी विद्यापीठाने तात्काळ याबाबत कारवाई केली आहे, हा संघटीत लढण्याचा विजय आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या