आंबेडकरी महिला चळवळीचे नेतृत्व खंबीरपणे पेलणा-या प्रा.डॉ.अंजलीताई प्रकाश आंबेडकर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आंबेडकरी महिला चळवळीचे नेतृत्व खंबीरपणे पेलणा-या प्रा.डॉ.अंजलीताई प्रकाश आंबेडकर


 आंबेडकरी महिला चळवळीचे नेतृत्व खंबीरपणे पेलणा-या प्रा.डॉ.अंजलीताई प्रकाश आंबेडकर


राजकीय क्षेत्रांत कार्य करणा-या महिलांची संख्या तसे पाहता आजही म्हणावी तशी फारशी वाढलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच चळवळींमध्ये पुरूष कार्यकत्र्यांसोबतच असंख्य महिलांचा समावेश असायचा. सुशिक्षित आणि अशिक्षित असा चळवळीतील महिलांमध्ये भेद नव्हता. महिला मोठयाप्रमाणात बदल घडवू शकतात हा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होता. तत्कालिन चळवळीत कार्य करणाछया महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला बदल घडवून आणला हा इतिहास सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि त्यांच्या तत्त्वाला प्रामाणिकपणे साथ देवून कार्य करणारे निणNयक्षम प्रामाणिक कार्यकर्ते, समाजसुधारक, नेते आपल्या कार्याचा ठसा उमटवून गेले. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकही घडामोडी मोठ्याा प्रमाणात भारतात घडल्या. प्रत्येक प्रसंगानुरून आंबेडकरी निष्ठावान कार्यकत्र्यांनी आपआपली जबाबदारी मोठ्याा हिमतीने पार पाडली. लोकनेते यशवंतराव भिमराव आंबेडकर यांनी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी कामगीरी केली. दलित पँथरचे राजा ढाले, ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, नामदेव ढसाळ, आदी सर्वांनी अन्यायी वर्गाविरूध्द मोठया प्रमाणात कार्य केले. काळ कोणताही असला तरी जातीनुसार महिलांवरील अन्याय, महिला म्हणून अन्याय थांबला नाही. त्यामुळे सक्षम महिलांचे राजकीय, सामाजिक संघटन हे सतत आवश्यक होते. यशवंतराव भीमराव आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आ. मीराताई आंबेडकर यांनी भारतीय बौध्द महासभेची जबाबदारी सांभाळली. त्यासोबतच धार्मिक आणि सामाजिक वाटचालही केली.

        

आंबेडकरी नवबौध्द समाज एका धर्माकडून दुसछया धर्माकडे वाटचाल करत होता. ही वाटचाल फार सोपी नक्कीच नव्हती. जात्यांधांना, धर्मांधांना अन्याय करण्याची आणि आपले अस्तित्व टिकविण्याची संधी पाहिजे होती. ही संधी जशी मिळेल तशी ते त्याचा उपयोग करत होते. त्यामुळे चळवळी मोठ्याा प्रमाणांत होत. आजही त्या थांबल्या नाही. असे असताना नामांतराची चळवळ ही औरंगाबादेतून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. सर्वच स्थरातून महिला पुरूष वृध्द नामांतराच्या चळवळीत प्रकर्षाने भाग घेत होते. याच काळात अ‍ॅड प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांचा सार्वजनिक राजकीय क्षेत्रातील प्रवेश हा महत्त्वपूर्ण ठरला.

         

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव भीमराव आंबेडकरानंतर आंबेडकरी समाजाला समजून घेणारा त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झटणारा नेता मिळाला. अ‍ॅड. प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांच्या आयुष्यात अंजली मायदेव यांचे आगमन झाले. अंजली मायदेव प्रा. डॉ. अंजली प्रकाश आंबेडकर झाल्या. प्रा. अंजलीताई यांना चळवळीचा वारसा दोनही कुटुंबामधून मिळाला. त्यामुळे चळवळीची आणि सकारात्मक विचारांची बैठक ही त्यांची आहेच. समतेच्या दृष्टिने स्त्रीवादी विचार अर्थात आज ज्याला आपण आंबेडकरी स्त्रीवाद म्हणून विचार करायला आणि मोठया प्रमाणात चर्चा करायला लागलो आहोत तो त्यांच्यात मूळातच रूजलेला. 


अंजलीताईंनी संपूर्ण महाराष्ट्रभर महिला संघटनेची बांधणी केली. भारिप नंतर वंचित बहुजन आघाडी या बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय पक्षातील महिलांची मार्चेबांधणीची धुरा यशस्वीपणे डॉ. अंजलीताई आंबेडकर यांनी पार पाडली आहे. प्रदेश, शहर, गांव, तालुका अशा प्रत्येक ठिकाणी महिलांची संघटना उभारली. सभा, कार्यशाळा, परिषदेतील त्यांचे मार्गदर्शन अत्यंत अनमोल आहे. त्यांच्या सोबत रेखा ठाकूर, मंगल खिवंसरा यांचे कार्य ही महत्त्वाचे आहे. अंजलीताई यांच्यासंदर्भात विषेश सांगायचे म्हणजे त्यांचा परखड आणि ठाम निर्णय घेण्यारा स्वभाव. 


ताईंसोबत प्रत्यक्षपणे भेटण्याचा योग प्रथमतः रमाई चळवळीचे दुसरे साहित्य संमेलन औरंगाबादेत असतानाचा आला होता. रमाई चळवळीचे साहित्य संमेलन औरंगाबादेत २७ मे २०१३ मध्ये आयोजित करण्यात आले. या साहित्य संमेलनाला अध्यक्ष प्रसिध्द कवयित्री हिराताई बनसोडे होत्या तर उद्घाटक प्रा. अंजलीताई आंबेडकर होत्या. संमेलनासाठी ताईंचे आगमन २६ मे ला औरंगाबादेत झाले. त्यांना मी, प्रा. भारत शिरसाठ, आनंद चक्रनारायण, प्रज्ञा साळवे, डॉ. किशोर साळवे आदी भेटलो चर्चा झाली. दुसNया दिवशी प्रा. अविनाश डोळस सर, मंगल खिवंसरा, रेखा ठाकूर आणि ताई संमेलनाच्या उद्घाटनासाठी आले. ताईंचे उद्घाटकीय भाषण अत्यंत प्रभावी होते. अर्थात त्यानंतर अमरदीप वानखडे यांच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान तर्फे प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते विदुशी गेल अ‍ॅम्वेट यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याही कार्यक्रमातील त्यांचे स्त्रीवादींच्या अनुशंगाने करण्यात आलेले भाषण आणि गेल मॅडम यांच्या संदर्भाने केलेले भाषण अप्रतिम होते.


आंबेडकरी महिला चळवळीच्या मोट बांधणीसाठी, महिलांच्या अन्याय अत्याचारावर चर्चा आणि कृती करण्यासाठी, त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल या साठी त्यांची जागृकता अत्यंत महत्त्वाची आहे. तसे पाहता व्यक्ती तेवढया प्रवृत्ती चळवळ कोणतीही असो जेवढे समर्थक तेवढेच विरोधकही असतात. काही आपली पोळी कशी भाजल्या जाईल याच्याच प्रयत्नात असतात. चळवळीला लागलेली ही कीड आंबेडकरी महिला चळवळीला देखील स्पर्शृन गेली आहे. असे असतानाही खंबीरपणे खछया अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसांत रूजविण्ो आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना सोडविण्याचे कार्य प्रा. डॉ. अंजलीताई आंबेडकर आणि त्यांच्या नेतृत्वात उभारलेली महिलांची संघटना करते आहे. प्रा. डॉ. अंजलीताई आंबेडकर यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देते.   


डॉ. रेखा मेश्राम

संपादक, मासिक रमाई

औरंगाबाद


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या