आरोपींना तात्काळ अटक करा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी
औरंगाबाद/प्रतिनिधी: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात नगर पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये भटक्या-विमुक्त जमातीतील नाथजोगी भराडी नागपंथी डवरी गोसावी समाजाच्या 32 वर्षीय महिलेला भाजपा नगराध्यक्षांसह 30-40 कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामध्ये मोहिनी नितीन जाधव या महिलेचा अंत झाला ही घटना निषेधार्थ असून भाजपा सरकार जनतेच्या हितासाठी सत्तेत आहे की, जनतेचा जीव घेण्यासाठी असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
अच्छे दिनाच्या नावाखाली भाजपा सरकारला जनतेने सत्तेत आणले आहे परंतु आजपर्यंत अच्छे दिन जनतेला पाहायला मिळालेले नाहीत. भाजपा सरकारच्या काळात सर्वात जास्त महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटना थांबविण्यासाठी हे सरकार हाणून पाडण्याची गरज असल्याचे वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहर प्रसिद्धी प्रमुख कोमल हिवराळे यांनी ‘वंचितनामा’शी बोलतांना सांगीतले.
सदरील घटनेविरोधात (दि. 26 जाने.) वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुले-आंबेडकर विद्वत सभा आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मूक निदर्शने करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष योगेश बन, महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा वंदनाताई नरवडे, मध्य शहर अध्यक्ष जलिस भाई, युवा अध्यक्ष सतिष गायकवाड, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजू देहाडे, शाम भारसाखळे, सतिष शिंदे महासचिव युवा आघाडी, संगिता अंभोरे महिला आघाडी शहर प्रवक्ता, कोमल हिवाळे शहर प्रसिद्धी प्रमुख महिला आघाडी, शुभम साळवे माजी शहर उपाध्यक्ष, श्रीरंग ससाणे, प्रदिप धनेधर, संदीप जाधव, सुरेंद्र रानेकर, रूपचंद गाडेकर, सम्यक विद्यार्थी आंदोलन, विद्वत्तासभा, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या