काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा भीमोत्सव 2022, विविध कार्यक्रमांचे आयोजन
औरंगाबाद: येथील काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये अध्यक्ष विलास बापू औताडे,उपाध्यक्ष हिशाम उस्मानी तर सचिवपदी अनिल मालोदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,कार्यकारिणीचे मार्गदर्शक म्हणून नामदेव पवार,उत्तमसिंह पवार, माजी आमदार कल्याण काळे, आमदार सुभाष झंम्बड, केशवराव औताडे, प्रकाश मुगदीया,ऍड.इक्बालसिंग गिल,इब्राहिम पठाण, सय्यद हमीद, ऍड.अंजलीताई वडजे व रेखा राऊत असणार आहेत,डॉ. अरुण शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गांधी भवन येथे पार पडलेल्या बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
भिमोत्सव सप्ताहात ,संविधान जनजागृती या उपक्रमांतर्गत, संविधान वाटप करण्यात येणार आहे,बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ व मिलिंद प्रश्न मोफत वितरित करण्यात येणार आहेत, अनेक क्षेत्रात योगदान देणाऱ्या, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, प्रसिध्द व नामवंत व्याख्यात्यांची वैचारिक व्याख्याने व्याख्यानमाले अंतर्गत होणार आहेत, वक्तृत्व स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा,स्पर्धा परीक्षा प्रश्नमंजुषा, भीम गीत गायन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती ,आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबीर, रोजगार निर्मिती व स्वयंरोजगार शिबीर, पाली भाषा बोला व शिका उपक्रम व महिला सक्षमीकरणच्या दृष्टीने विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे,
हा भिमोत्सव सप्ताह म्हणून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून 7 एप्रिल ते 12 एप्रिल 2022 दरम्यान मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे, पहिल्यांदाच काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, यांच्या वतीने भिमोत्सव घेण्यात येणार आहे, 7 एप्रिल 2022 रोजी उदघाटन समारंभ होईल, तर 12 एप्रिल रोजी या भिमोत्सवाचा समारोप होईल.यासर्व कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व लाभ घेण्याचे आवाहन, मुख्य संयोजक डॉ. अरुण शिरसाट यांनी केले आहे.या बैठकीला याप्रसंगी किशोर सरोदे, डॉ. मिलिंद आठवले,ऍड.संतोष लोखंडे, शिरीष चव्हाण, जयपाल दवणे, संदीप जाधव, इंद्रिस नवाब, सय्यद
सलमान, अशोक चक्रे, प्रकाश वाघमारे, पद्माकर कांबळे, विजया भोसले, अनिता भंडारी, इरफान पठाण, अलंकृत येवतेकर, आनंद भामरे, अमोल होरशील, आनंद साळवे, अखतर मातीन,गुरमित गिल, प्रा. डॉ. बाळासाहेब अंभोरे,प्रमोद धुळे, सुदाम सोनोने,गौतम इंगोले व किशोर साळवे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,शहरातील अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या