...तर लोणीकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही ; डॉ. अरूण सिरसाट

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

...तर लोणीकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही ; डॉ. अरूण सिरसाट

आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट दाखल करण्याची कॉंग्रेस अनु. जाती विभागाची मागणी

सोशल 24 नेटवर्क/प्रा. शिलवंत गोपनारायण

औरंगाबाद: वीज बील संदर्भात महावितरण कर्मचा-यांना फोनवरून धमकी देवून लोकशाही नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी आणि बहुजन वस्तीचा जातिवाचक उच्चार केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे अनु. जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अरूण सिरसाट संतप्त झाले असून आमदार लोणीकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा डॉ. सिरसाट यांनी सोशल 24 नेटवर्कशी बोलतांना दिला. आहे.  

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित कार्यकर्ते


यासंदर्भात आज 31 मार्च जिल्हाधिका-यांना निवेदन कॉंग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. डॉ. सिरसाट यांनी यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांच्या अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट नुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.  


निवेदन देण्यासाठी काँग्रेस कमिटी अनु.जा. विभागाचे किशोर सरोदे, जयपाल दवणे, प्रा.शिलवंत गोपणारायन, रेखा राऊत, हरचरणसिंग गुलाटी, शकुंतला साबळे, अनिता भंडारी, प्रकाश वाघमारे, असमत खान, शिरीष चव्हाण, संदीप जाधव, अलंकृत येवतेकर , अशोक चक्रे, प्रकाश वाघमारे, गौतम इंगोले, सुनील साळवे, विजया भोसले, रंजनाताई हिवराळे, सविता इंगळे, संगीता डोंगरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 


डॉ. सिरसाट यावेळी म्हणाले की,  दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमजयंती साजरी करता आली नाही व यावेळेस भीमजयंती चा उत्साह वाढतो आहे आणि मोठ्या प्रमाणात भीमजयंती साजरी होते की काय याबाबत लोनिकरांच्या पोटात दुखत तर नाही अशी शंका डॉ.अरुण शिरसाट यांनी व्यक्त केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या