सर्व पक्षीय बैठकीत रेखा ठाकूर कडाडल्या ; राज ठाकरेंना...

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सर्व पक्षीय बैठकीत रेखा ठाकूर कडाडल्या ; राज ठाकरेंना...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर UAPA कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल  करण्यात यावा - रेखा ठाकूर

Social24Network

मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखता यावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने मुंबईमध्ये सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रकरणी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. 

रेखा ठाकूर, प्रदेशाध्यक्षा (वंचित)


रेखा ठाकूर यांनी दोन जातीमध्ये तेढ निर्माण करणा-या राज ठाकरे यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. 


 ठाकूर म्हणाल्या की, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकारने विचार विनिमय करण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावून सुचना व उपाय योजना मागविल्यात त्याबद्दल  सरकारचे  स्वागत आहे.  सध्यस्थितीत महाराष्ट्रातील वस्त्यांमध्ये भितीदायक व  तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा आणि भडकावू भाषणांमधून वातावरण बिघडवत आहे. परंतू देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या भाषणातून समोर आलेली गंभीर गोष्ट ही आहे की ते म्हणाले की, 'त्यांना काही पोलीसवाले कानात सांगत आहेत की काही मशिदीत व मदरशात समाज विघातक कामे चालू आहेत.'  

                  

तर मग आमची अशी मागणी आहे की सरकारने याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन झाडाझडती घेतली पाहीजे व यात  काही तथ्य आढळून आल्यास कडक कारवाई पण केली पाहिजे. आणि जर यात काही सापडले नाही तर याचा अर्थ राज ठाकरे दोन समाजात तेढ वाढवण्यासाठी संदेह पसरवून भडकावू भाषणे करत आहेत. आपल्या वक्तव्याने हिंदु समाजात गैरसमजातुन भय व दहशत पसरवत आहेत हे स्पष्ट होते हीच समाज विघातक कृती आहे.  शांतता व सुव्यवस्थेला सुरुंग लावत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर UAPA कायद्या अंतर्गत कारवाई केली पाहीजे. 

                   

वंचितचे ग्राऊंड वरील कार्यकर्ते सांगत आहेत की, जनता शांत आहे परंतू राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची हालचाल लक्षात येण्या इतकी वाढलेली आहे. परिस्थिती चिघळू द्यायची नसेल तर या  कार्यकर्त्यांवर करडी नजर ठेवली पाहिजे. गरज वाटल्यास काही संशयित लोकांना ताब्यात घेतले पाहिजे. याच परिस्थितीमुळे मुस्लिम समाजामधील काही कट्टर कार्यकर्ते याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आढळले तर या सेक्शन वर सुध्दा लक्ष ठेवून उर्वरित मुस्लीम समाजाला सुरक्षिततेच्या बाबतीत सरकारने आश्वस्त केले पाहिजे. महाराष्ट्रात आजपर्यंत ज्या दंगली झाल्यात त्यामध्ये ज्या संघटना व व्यक्तीचा सहभाग आढळून आला त्या संघटना व व्यक्तीचा वेळीच बंदोबस्त करावा. राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी वरील सुचना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी सर्व पक्षीय बैठकीत महाराष्ट्र सरकारला केल्या आहेत. सदर बैठकीस मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान, सरचिटणीस आनंद जाधव यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या