औरंगाबाद (प्रतिनिधी): सध्या धर्माधर्मात भांडणे लावली जात आहेत. तरुण बेरोजगारीने त्रस्त आहेत. जनता महागाईन होरपळत आहे. देश कर्जबाजारी होत आहे. अशा स्थितीत छोट्या वृत्तपत्रांनी आपली राष्ट्रीय जबाबदारी ओळखली पाहिजे. याच पार्श्वभूमीवर‘निळे प्रतीक या साप्ताहिकातून दैनिकात रूपांतरित होणे गरजेचे वाटते. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक तथा विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी सुभेदारी विश्रामगृहातील एका कार्यक्रमात बोलताना केले.
साप्ताहिक ‘निळे प्रतीक’चे संपादक रतनकुमार साळवे व दै. बुलंद शक्तीचे संपादक रामेश्वर दरेकर या दोन पत्रकारांचा वाढदिवस २ मे रोजी सुभेदारी विश्रामगृह येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, हे उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मण भुतकर, प्रा. भारत सिरसाठ, लेखक धनराज गोंडाणे यांचीही उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पुढे बोलताना डॉ. कांबळे म्हणाले की, एकीकडे देशावर कर्ज वाढत आहे, तर दुसरीकडे भांडवलशाही वरचढ होत आहे. सामान्य माणसाचा आवाज दडपला आज आहे. अशा वेळी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. जनतेला न्याय देणारा पत्रकार हा निर्भय वृत्तीचा असायला हवा. खरे म्हणजे आज छोट्या वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा प्रा. डॉ. कांबळे यांनी व्यक्त केली. संपादक रतनकुमार साळवे यांनी प्रतिकूल परिस्थितीतून वृत्तपत्र सुरू ठेवले. सामाजिक बांधिलकी जपली. खरोखरच साळवे यांची वाटचाल कौतुकास्पद असून ‘निळे प्रतीक’ आता दैनिक झाले पाहिजे, असे प्रा. डॉ. कांबळे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
यावेळी प्रा. भारत सिरसाठ यांनी पत्रकार हा घटक सामान्य जनतेच्या हितासाठी किती महत्त्वाचा आहे, याकडे लक्ष वेधून घेतले. रतनकुमार साळवे यांची एकूण पत्रकारितेची वाटचाल ही तारेवरची कसरत आहे, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते लक्ष्मण भूतकर यांनी सध्या गाजत असलेले भोंगा प्रकरण गंभीर असून ते जातीय तेढ निर्माण करीत आहे, असे सांगितले. भोंगा वाजवत राहिलो तर जनतेचे प्रश्न कसे सुटणार का ? भोंग्यामुळे बेरोजगारी संपुष्टात येणार आहे काय? असे अनेक सवाल लक्ष्मण भूतकर यांनी उपस्थित केले.
संपादक रतनकुमार साळवे व संपादक रामेश्वर दरेकर या उभयतांनी आपल्या संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकला. आमची पत्रकारिता सामान्य जनतेच्या हिताची आहे, असे या संपादकांनी नमूद केले. रवी बनकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे हे विचारवंत असून ते समाजाचे मार्गदर्शक आहेत, असे रवी बनकर यांनी सांगितले.
संपादक रतनकुमार साळवे व संपादक रामेश्वर दरेकर या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी संजय सोनखेडे,बाजीराव सोनवणे, गजानन इंगळे, शेख शफीक, बबनराव सोनवणे, मनीष अग्रवाल, देविदास कोळेकर, वसंत सिरसाठ, अंबादास तळणकर, हसन शहा, अश्वजित बनकर, सुनील निकाळजे, प्रवीण बनकर,, सुधाकर निसर्ग, गणेश पुजारी, कारभारी त्रिभुवन, प्रवीण बोर्डे, सुनील काकडे, सुनील खराबे, बाबूरराव जुंबडे, प्रकाश पवार, संजय सरवदे, दशरथ कांबळे, गजानन सुरडकर, प्रवीण बनकर, राहुल साळवे, नदीम सौदागर, सुरेश क्षीरसागर गजानन इंगळे इंदर्जितशिंग अट्टल, देविदास कोळेकर,अशोक जोहरे, कवी जाधव, वसंत सिरसाट, जगन्नाथ सुपेकर, सुधाकर निसर्गन,हसन शहा,राजेंद्र हिवरे, रमेश बावस्कर, मनीष अग्रवाल, टिनू साळवे, दीपक पवार आदींची उपस्थिती होती.
*शालेय साहित्याचे वाटप*
याच कार्यक्रमात प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, भारत सिरसाठ, धनराज गोंडाणे यांच्या हस्ते शाळकरी मुलांना दप्तराचे वाटप करण्यात आले. या दप्तरात वर्षभर पुरतील एवढ्या वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, या शालेय साहित्यांचाही समावेश आहे. दप्तर वाटपाच्या या उपक्रमाची यावेळी सर्व पत्रकारांनी प्रशंसा केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त हे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. ज्येष्ठ दिवंगत नेते, शिक्षण महर्षी संस्थाचालक माधवराव बोर्डे यांच्या नावाने कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानतर्फे सदरील शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
0 टिप्पण्या