परभणी (प्रतिनिधी) - डॉ. दीपाली कांबळे पशुधन विकास अधिकारी, पशुवैध्यकीय दवाखाना श्रेणी १ मानवत, परभणी येथे कार्यरत आहेत. त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे पशुधन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, कडून शासकीय गुणवंत पशुवैध्यक पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार पशुसंवर्धन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणार आहे. २० मे रोजी शरदचंद्र पवार सभागृह, जिल्हा परिषद पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
डॉ. दीपाली कांबळे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. आर्थिक अवस्था वाईट आहे म्हणून त्या खचल्या नाहित. परिस्थितीवर रडत न बसता संघर्ष करत त्यांनी शासकीय नोकरी मिळवली. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असल्यामुळे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेवून शासनाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.
आपण आपल्या कर्तव्यात कसूर करू नये, प्रामाणिकपणे आपले काम करत राहावे. त्याची दखल निश्चितच घेतली जाते. मी फुले,शाहू, डॉ. आंबेडकर यांचे विचार घेऊन मार्गक्रमण करत आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मी हुरळून जाणार नाही. अधिक प्रभाविपणे मी माझे काम सुरूच ठेवेन. असे त्या आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाल्या. हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांच्यावर सर्वं स्थरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या