अमरावतीमध्ये शांतता सदभावना रॅली संपन्न

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अमरावतीमध्ये शांतता सदभावना रॅली संपन्न

वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने शांतता सदभावना मार्च संपन्न झाला.

सागर भवते, वंचितनामा न्यूज नेटवर्क
अमरावती - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई वानखडे यांच्या नेतृत्वात "शांतता सदभावना मार्च" (दि. 1 मे रोजी) काढण्यात आला.

पोलीस प्रशासनाने कलम 149 ची नोटीस देऊन, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन व कायदा व सुवेवस्था आबाधित राहावा या दृष्ठिकोनातून पोलीस प्रशासनाने अखेर परवानगी दिली, शांतता सदभावना रॅलीत हातात सुविचाराचे बॅनर घेऊन शांततेचे आव्हान जनतेस करत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, रॅलीस सुरुवात झाली. रेल्वे स्टेशन, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, चित्रा चौक, महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळ्याला अभिवादन करून, शांतता सदभावना रॅलीच्या संदर्भात पक्षांची भूमिका समजावून सांगितली. याबरोबरच केंद्र, व राज्य शासनाच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रा. डॉ. निशाताई शेंडे, जिल्हाध्यक्षा विद्याताई वानखडे, शहर महासचिव प्रमोद राऊत , शहरध्यक्षा पुष्पाताई बोरकर,राधा कांबळे, सुनीता जामनिक, विद्या बनसोड, मनोरमा इंगळे, अर्चना घरडे, सरला गवारगूर, विश्रांती मानवटकर, रंजना इंगळे, संगीता स्वर्गे, सविता रायबोले, रमेश आठवले, सुरेश तायडे,वैभव रायबोले,पंकज वानखडे, अतुल वानखडे, अजय तायडे, अलंकार बागडे, सिद्धाथ दामोधर शिलवंत खिराडे, अमरदीप खिराडे, मिलिंद वर्धे, आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय संविधानाचा  उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून शांतता सदभावना रॅलीचा समारोप करण्यात आला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या