पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शांतता मार्च संपन्न

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शांतता मार्च संपन्न

पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांतता मार्च संपन्न

वंचितनामा वृत्तसेवा, गणेश वाघमारे

पिंपरी चिंचवड - देशात राजकीय पक्षांनी जातीवादी भूमिका घेत समाजमनावर विपरीत परिणाम घडून त्यातून होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या  वळणावर असणाऱ्या महाराष्ट्रात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतता मार्चचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरामध्ये  प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या  मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . ही शांतता रॅली H.A.कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली.  पुढे ही शांतता रॅली मुंबई पुणे हायवे मार्गे खराळवाडी गावठाणातून जात असताना गावठाणा मधील जामा मस्जिद मधील मौलाना, मौलवी व सामाजिक कार्यकर्ते अजिज  भाई शेख व मुस्लीम बांधव यांनी शांतता मार्च रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले व मान्यवरांचा सत्कार करून महाराष्ट्रात शांतता नांदावी या सदिच्छा व्यक्त केल्या. 

पुढे ही रॅली राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नंतर  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या शांतता मार्च मध्ये वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उस्फुर्तपणे सहभागी होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या