"धम्म सागरातील शंखशिंपले" या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
भन्ते अश्वजीत लिखित ‘धम्मसागरातील शंखशिंपले’ पुस्तकाचे प्रकाशन करतांना उपस्थित मान्यवर |
ते (दि. १९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे रमाई प्रकाशन प्रकाशित आणि भ. अश्वजीत लिखित ‘धम्मसागरातील शंखशिंपले’ या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद कला महाविद्यालयाचे पालि विभाग प्रमुख भ. डॉ. एम. सत्यपाल हे होते. या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष करूणानंद थेरो हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हा सचिव भंते धम्मबोधी, रमाई प्रकाशनचे संचालक प्रा. भारत शिरसाट आदी उपस्थित होते.
भ. करुणानंद थेरो बोलताना म्हणाले की, समाजामध्ये नकारात्मक मांडणी करणारे लेखन वाढले असताना भ. अश्वजीत केवळ सकारात्मक लेखन करीत नाहीत तर ते संशोधनात्मक लेखन करतात आणि संशोधनात्मक लेखन करतांना त्याची कारणमीमांसाही ते स्पष्ट करतात. बौद्ध धम्मज्ञानाचे विद्यापीठ म्हणजे भन्ते अश्वजीत होय, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भन्ते अश्वजीत यांनी केले. प्रकाशकीय भुमिका प्रा. भारत सिरसाट यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरदीप वानखडे यांनी केले तर आभार प्रा. प्रकाश इंगळे यांनी मानले. यावेळी भिक्खू दीपंकर भिक्खू विनयशील, भिक्खू संघपाल, रतनकुमार पंडागळे, डॉ. रेखा मेश्राम, अंजना तिडके, अनुमती वानखडे, सायली वानखडे, प्रबुद्ध सिरसाट, मोहित मेश्राम, राजेश वानखडे, सी. पी. पाटील, रवींद्र गवई, सुनील वाघमारे, एडवोकेट एस. आर. बोदडे, दैवशाला गवंदे, व्ही. के. वाघ, रवींद्र तायडे, प्रा. देवानंद पवार, धनराज गोंडाणे, अरुण बागुल, नथू अहिरे, रतनकुमार साळवे, बी.के. हिवराळे, कवी सुदाम मगर आदींसह शहरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या