विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ‘सम्यक’ आक्रमक ; विद्यापीठात आंदोलन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ‘सम्यक’ आक्रमक ; विद्यापीठात आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज दि. 24 ऑगस्ट रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. 


औरंगाबाद/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्यांसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांबाबत आज (दि. 24 ऑगस्ट रोजी) सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करण्यात आले.

कुलगुरूंना निवेदन देतांना सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. यावेळी कुलगुरूंनी सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी रामेश्वर कबाडे, संकेत कांबळे, ऋषीकेश कांबळे, रोहित जोगदंड,  अॅड. नागसेन वानखडे, अमरदीप वानखेडे, स्वाती चेके, संतोष जाधव, ज्योती मालवे, दीपा वळवी, सुयश नेत्रागवकर,रोहित जाधव,रोहित वानखेडे, गोलू गवई, संतोष अंभोरे, सोनू गायकवाड, कैलास असरमल, नालंदा वाकोडे, प्रवीण इंगळे, सुमित वाघमारे, विनोद लाडगे, लिलेश सोनवणे,वैभव कांबळे, साबळे वी. बी.,संजय गवई, अर्जुन पट्टेकर, प्रकाश वालेकर, अनिल जाधव, वैभव रांजवे, एम. खिल्लारे, हर्षल पांडे, हर्षल सुर्वे, किरण तुरेराव, तथागत वटोरे,  भास्कर निकाळजे, रवी इंगळे, भारत हिवराळे आदींसह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागण्या:

1. पीएचडी. प्रोग्रेस रिपोर्टचे शुल्क 1700 रूपये करण्यात यावे

2. पीएच. डी ट्युशन फी कमी करण्यात यावी

3. कमवा आणि शिका योजनेचे मानधन 4000 रूपये करण्यात यावे.

4. जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागातील पीएचडी संशोधक विद्यार्थी अमरदीप वानखडे यांना तत्काळ प्रवेश देण्यात यावा

5. एम. टेक विभागातील पीएच. डी प्रवेश कॉम्प्युटर सायंस विभागात वर्ग करण्यात यावे, पालि विभागातील 12 पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश देण्यात यावा

6. पेट 2022 परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी

7. रिडींग हॉलच्या विद्यार्थ्यांकरीता भोजनकक्ष उभारण्यात यावे

आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. सदरील मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रा. प्रकाश इंगळे यांनी यावेळी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या