औरंगाबाद/प्रतिनिधी - सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, औरंगाबादच्या वतीने स्थानिक तापडिया नाट्य मंदिर येथे एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला औरंगपुरा स्थित म. जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यांनतर भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. ई. हरिदास, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, प्रा. भारत सिरसाट, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमोल खरात, इंजि. निनाळे, प्रा. समाधान इंगळे, डॉ. रेखा मेश्राम आदींसह मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम पहा...!
यावेळी लेझीम पथक, एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पथसंचलनाने शहराचे लक्ष वेधून घेतले. रॅलीमध्ये शहरातील विद्यार्थी-विद्यार्थिनीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या