संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
औरंगाबाद/प्रतिनिधी- फुले-आंबेडकर विद्वत सभेच्यावतीने भारतीय संविधान दिनानिमित्त दि. २७ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, नागसेनवन, औरंगाबाद येथे दुपारी २ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आर. के. क्षीरसागर हे असणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून संविधानाचे अभ्यासक ऍड. संघपाल भारसाखळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून फुले-आंबेडकर विद्वत सभेचे मार्गदर्शक डॉ. संजय मून हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फुले-आंबेडकर विद्वत सभेचे मराठवाडा समन्वयक डॉ. प्रज्ञा साळवे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या