विद्यापीठाला राजकारण्यांचा अड्डा बनवायचा नसेल तर वंचित बहुजन परिवर्तन पॅनलला निवडुन आणा ; अॅड. सर्वजीत बनसोडे
औरंगाबाद/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीसाठी 17 वर्षे संघर्ष करावा लागला. नामांतर झाले परंतु अजूनही आमचे प्रश्न सुटलेले नाहीत. आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेला हा परिसर राजकारण्यांचा अड्डा बनला आहे. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव असल्यामुळे बदनाम करण्याचे षडयंत्र हाणुन पाडण्यासाठी आपले प्रश्न, समस्या समजून घेणा-या वंचितांतील पदवीधरांना सिनेटमध्ये निवडुन आणा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सर्वजीत बनसोडे यांनी केले.
ते गुरूवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात वंचित बहुजन परिवर्तन पॅनल आयोजित पदवीधर मेळाव्याला संबोधित करतांना बोलत होते. पुढे बोलतांना अॅड. बनसोडे म्हणाले की, वंचित घटकांनी राजकारण विरहीत संस्थांवर ताबा मिळवला पाहिजे. शिक्षणाबरोबरच सन्मानजनक नोक-या मिळाल्या पाहिजे यासाठी शिक्षणाच्या बाजारीकरणाचा डाव हाणुन पाडण्याची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता राखायची असेल तर अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या विद्यार्थ्यांनी पाठीशी खंबीरपणे उभे राहुन वंचित बहुजन परिवर्तन पॅनलला निवडुन द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे, अॅड. पंकज बनसोडे, रोहीत जोगदंड, विजय धनगर, अमरदीप वानखडे आदींची भाषणे झाले. मेळाव्याला सुनिल वाघमारे, अण्णासाहेब सोनवणे, रविंद्र गवई, संकेत कांबळे, ऋषी कांबळे, सागर धोडपकर, संतोष अंभोरे, प्रकाश उजगरे, आर. के. पाटील, नितिन हजारे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन अॅड. नागसेन वानखडे यांनी केले तर आभार शाहीर मेघानंद जाधव यांनी मानले.
वंचित बहुजन आघाडी प्रणित वंचित बहुजन परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार
खुला प्रवर्ग
प्रा. प्रकाश इंगळे, अॅड. पंकज बनसोडे, नितिन फंदे, अनिस तडवी, कैलास सरकटे
एस सी प्रवर्ग - रोहीत जोगदंड
एस टी प्रवर्ग - भागवत बर्डे
व्हीजेएनटी प्रवर्ग - विनोद आघाव
महिला प्रवर्ग - अॅड. नंदा गायकवाड
0 टिप्पण्या