Dr. BAMU SENATE ELECTION | वंचित बहुजन परिवर्तन पॅनल मैदानात

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

Dr. BAMU SENATE ELECTION | वंचित बहुजन परिवर्तन पॅनल मैदानात

वंचित बहुजन आघाडी प्रणित वंचित बहुजन परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी जल्लोशपुर्ण वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल केला.


औरंगाबाद/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 2022 च्या अधिसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली असून आज (दि. 3 नोव्हेंबर) रोजी वंचित बहुजन परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी जल्लोशात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 





सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत नामांकन रॅली काढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ. शिवाजी महाराज, म. ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश बन, पूर्वचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लताताई बामणे, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ तेजाद आदींसह वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 


वंचित बहुजन परिवर्तन पॅनलचे उमेदवार:

प्रकाश दादाराव इंगळे यांनी सर्वसाधारण गटातुन अर्ज दाखल केला. तर अॅड. पंकज बनसोडे, अॅड. नंदा गायकवाड, नितिन फंदे, अनिश तडवी, पल्लवी खोतकर यांनीही सर्वसाधारण गटातुन उमेदवारी अर्ज दाखल केला. अनुसुचित जाती मधुन रोहित जोगदंड, अनुसुचित जमातीमधुन भागवत बर्डे, विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातुन विनोद अघाव आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 


ढोल-ताशाच्या पथकासह नामांकन रॅली शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहपुर्ण वातावरणात काढण्यात आली. फटाक्यांच्या आतिशबाजीसह घोषणाबाजीने विद्यापीठाचा संपुर्ण परिसर दुमदुमला. याप्रसंगी अॅड. नागसेन वानखडे, मेघानंद जाधव, अमरदीप वानखडे, संकेत कांबळे, ऋषी कांबळे, सागर धोडपकर, सिद्धार्थ कांबळे, रोहिदास जोगदंड, प्रकाश उजगरे, प्रविण हिवराळे, हर्षपाल खाडे, नालंदा वाकोडे, संदीप हिवराळे, हर्षवर्धन कांबळे, राहुल कांबळे, संतोष अंभोरे, वाल्मिक वाघ, चंचल जगताप, जागृती वाघमारे, प्रतीक्षा शिंगाडे, विद्या दिवेकर, सुची कांबळे आंदीसह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या