भारतीय संविधान जनजागरण रॅली उत्साहात संपन्न

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय संविधान जनजागरण रॅली उत्साहात संपन्न

औरंगाबाद/प्रतिनिधी - भारतीय संविधानाविषयी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि संविधानाची मूलतत्वे सर्वसामान्यांच्या मनामनात रूजावी या हेतुने आज (ता. 7 नोव्हेंबर) औरंगाबाद येथे भारतीय संविधान जनजागरण रॅली काढण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण करून रॅलीला सुरूवात झाली. त्यानंतर मील कॉर्नर येथील म. फुले आणि क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना हारार्पण करण्यात आले. रॅलीमध्ये प्रबुद्ध भारत सिरसाट याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची साकारलेली भुमिका रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.



यावेळी संविधान प्रचारक अनंत भवरे, कॉ. भिमराव बनसोड, प्रा. भारत सिरसाट, जितेंद्र भवरे, प्रभाकर बकले, सतीश गायकवाड, प्रा. प्रकाश इंगळे, अमरदीप वानखडे, आसाराम गायकवाड, डी. व्ही. खिल्लारे, दैवशिला गवंदे, दादा कांबळे, महेंद्र पोपलवाड, बापुराव कांबळे, प्रविण सरपे, सुनिल खरात, शैलेंद्र मिसाळ, अरविंद अवसरमोल, प्रफुल अवसरमोल आदींसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे समतादुत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या