सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कुलगुरूंना निवेदन
औरंगाबाद/प्रतिनिधी - राज्यात ओला दुष्काळ पडला असुन त्याची झळ मराठवाड्याला अधिक बसली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेत विद्यापीठ प्रशासनाने पीएच. डी कोर्सवर्क आणि रिसर्च सेंटरचे शुल्क सरसकट माफ करावे, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मा. प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांनी आज (दि. 7 नोव्हेंबर रोजी) कुलगुरूंना निवेदन देवून केली आहे.
यावेळी अमरदीप वानखडे, सुनील वाघमारे, अमोल घुगे, चंचल जगताप, प्रकाश उजगरे, हर्षपाल खाडे, संतोष जाधव, भुषण चोपडे, स्वप्नील काळे, समाधान पडघान, मोहित मोरे, सचिन जाधव, विशाल भगत, मंगेश मोहोड आदींसह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या