औरंगाबाद/प्रतिनिधी - लोकनेते भय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने रमाई प्रकाशन औरंगाबाद प्रकाशित आणि प्रा. भारत सिरसाट संपादित ‘भारतीय बौद्ध महासभा: कार्य व इतिहास’ या ग्रंथावर दि. 12 डिसेंबर रोजी सायं. 6 वाजता मौलाना आझाद संशोधन केंद्र, आमखास मैदान येथे परिसंवादाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक तथा कवी डॉ. संजय मून हे असणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणुन प्रसिद्ध समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, पालि भाषा अभ्यासक डॉ. भन्ते एम. सत्यपाल, सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अॅड. के. ई. हरिदास, साहित्यिक तथा कवी उत्तम अंभोरे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या