असामाजिक तत्वांशी लढण्याची कुवत आंबेडकरवाद्यांमध्येच ; प्रा. गंगाधर अहिरे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

असामाजिक तत्वांशी लढण्याची कुवत आंबेडकरवाद्यांमध्येच ; प्रा. गंगाधर अहिरे

रमाई मासिकाचा १३ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

औरंगाबाद/प्रतिनिधी - वृत्तपत्रे ही समाजाला दिशा देण्याचे काम करीत असतात. बाबासाहेबांची अनेक वृत्तपत्रे पैशाअभावी बंद पडली. परंतु धर्मचिकित्सेशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही हा प्रभावी विचार त्यांनी माध्यमांमधून मांडला. परंतु आज घडीला चिकित्सा करण्यावरही बंदी आली आहे अशा स्थितीमध्ये असामाजिक तत्वांशी लढण्याची क्षमता केवळ आंबेडकरवाद्यांमध्ये असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा कवी प्रा. गंगाधर अहिरे यांनी केले. 

ते आंबेडकरी महिला चळवळीचे मुखपत्र  रमाई मासिकाच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त (दि. २५ डिसेंम्बर रोजी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित कार्यक्रमातून बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत डॉ. प्रकाश सिरसाट हे होते. प्रमुख वक्ते म्हणून वैज्ञानिक लेखिका प्रा. डॉ. सुनिती धारवाडकर, अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधू गायकवाड, रमाई मासिकाच्या संपादक प्रो. डॉ. रेखा मेश्राम आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना प्रा. अहिरे म्हणाले की, कुठलेही माध्यम उभे करणे व ते दीर्घकाळ चालवणे खूप कठीण आहे. चळवळीची अनेक माध्यमे उभी होतात परंतु दीर्घकाळ टिकत नाहीत. गेल्या १३ वर्षांपासून डॉ. रेखा मेश्राम अथक परिश्रमाने महिला चळवळीचे माध्यम अविरतपणे चालवीत आहेत. त्यांचे हे कार्य आंबेडकरी वृत्तपत्रीय इतिहासामध्ये नोंद करण्याजोगे आहे. 



प्रस्ताविकामध्ये प्रो. मेश्राम म्हणाल्या की, फुले-आंबेडकरी चळवळीचे साहित्य रमाई मासिकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न गेल्या १३ वर्षांपासून सुरू आहे. जातीच्या पलीकडे जाऊन व्यक्त होण्याचे माध्यम उभे करण्यासाठी आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठीचे एक पाऊल म्हणजे रमाई मासिक होय. 

डॉ. सुनीती धारवाडकर बोलतांना म्हणाल्या की, पुस्तकांचे व्यासंगी असलेले पुस्तकांवर प्रेम करणारे बाबासाहेब मनुस्मृती नावाचे पुस्तक जाळून टाकतात यावरून त्या पुस्तकामध्ये असलेली विषमता आपल्या लक्षात येईल. 



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैवशीला गवंदे यांनी केले तर आभार ललिता खडसे यांनी मानले. यावेळी डॉ. क्षमा खोब्रागडे,  जयश्री ढाकरगे, जनाबाई बी-हाडे राजकन्या गोंडाने, बेबीनंदा पवार, डॉ. प्रज्ञा साळवे, एकनाथ खिल्लारे, प्रा. भारत सिरसाट, सुधाकर निसर्ग, सविता अभ्यंकर, मंगल मुन, व्ही. के वाघ, डॉ. संजय मुन, सरला सदावर्ते, सुरेखा चौरपगार, सुशीला खडसे, नंदा उबाळे, संघमित्रा पट्टेकर, अनुमती तिडके, दीक्षा मेश्राम, कांचन सुरवसे, के. ई. हरिदास, अभय टाकसाळ, देवानंद पवार, रतनकुमार साळवे, शंकर मेश्राम अमरदीप वानखडे गजानन लांडगे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या