डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रमाई जयंती उत्साहाने साजरी
सागर धोडपकर
औरंगाबाद/प्रतिनिधी - पंढरपूरला जाण्याची इच्छा व्यक्त करणारी रमाई आपल्याला सर्वांनी माहिती आहे. यावेळी उत्तर देणारे बाबासाहेब स्वतःचे समतेने भरलेले पंढरपूर निर्माण करण्याचे आश्वासन रमाईला देतात. त्यांच्यातील झालेला संवाद हा बाबासाहेबानी बौद्ध धम्म स्वीकारून समतेची रुजवणूक करणारा ठरला, असे प्रतिपादन आंबेडकरी महिला चळवळीचे मुखपत्र रमाई मासिकाच्या संपादक प्रोफेसर डॉ. रेखा मेश्राम यांनी केले.
त्या आज (दि. ७ फेब्रु.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी रिडींग हॉल समोर आयोजित केलेल्या रमाई जयंती कार्यक्रमातून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मा. प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे होते. यावेळी ऍड. नागसेन वानखडे, आरती सोनवणे, कौशल्या मरकंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरदीप वानखडे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र गवई यांनी केले आभार सागर धोडपकर यांनी मानले. यावेळी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या