बायोमेट्रिक हजेरी रद्द करा ; 'सम्यक'चे विद्यापीठात आंदोलन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बायोमेट्रिक हजेरी रद्द करा ; 'सम्यक'चे विद्यापीठात आंदोलन

बायोमेट्रिक हजेरी रद्द करा ; 'सम्यक'चे विद्यापीठात आंदोलन

औरंगाबाद/प्रतिनिधी - पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांना सक्तीची करण्यात आलेली बायोमेट्रिक हजेरी रद्द करा, २०२२-२३ ची पेट तत्काळ जाहीर करा, संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधक केंद्राकडून होणारी पिळवणूक तत्काळ थांबवा यासह पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज (दि. १३ मार्च) सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने  विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर प्रा. प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.


यावेळी मा. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सदरील मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली असून लवकरच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. येत्या आठ दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या २० मार्च रोजी एकदिवसीय सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा सम्यकचे माजी प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांनी दिला आहे.

प्रमुख मागण्या
१) बायोमॅट्रिक हजेरी तत्काळ रद्द करण्यात यावी,
२) संशोधक विदयार्थ्यांना संशोधन केंद्रावर फक्त सहा महिन्यातुन एकदाच RAC ला बोलाविण्यात यावे.
३) बार्टी, सारथी, महाज्योती आणि इतर फेलोशीफ धारक विदयार्थ्यांना संशोधक केंद्र प्रगती अहवालासाठी तसेच
कव्हरिंग लेटर (अनावरण पत्र) देण्यास टाळाटाळ करणा-या संशोधन केंद्राची मान्यता तात्काळ रद्द करण्यात
यावी.
४) संशोधक विदयार्थ्यांची संशोधन केंद्राद्वारे होणारी पिळवणूक तत्काळ थांबविण्यात यावी.
५) संशोधन केंद्रामध्ये संशोधक विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
६) २०२२-२३ पेट परिक्षा जाहिरात लवकर प्रसिद्ध करावी.
७) जनसंवाद आणि वृत्तपत्रविभागात आंतरविद्याशाखेचे संशोधन मार्गदर्शक संशोधक विदयार्थ्यांसाठी उपलब्ध
करून देण्यात यावे.
८) फेलोशिपधारक विद्यार्थ्यांना संशोधक मार्गदर्शक सह्या करण्याठी टाळाटाळ करतात, अशा संशोधक
मार्गदर्शकांवर कारवाई करण्यात यावी
९) प्रोग्रेस रिपोर्टचे शुल्क ४५०० वरून २००० रूपये एवढे करण्यात यावे.
१०) एम. फील करणाऱ्या सर्व विद्याशाखांमधील ज्या संशोधक विदयार्थ्यांचे प्रबंध काही कारणांमुळे अद्याप सादर झाले नाही त्यांचे प्रबंध विद्यापीठाने स्वीकारावे.

यावेळी आर. के. पाटील, अमरदीप वानखडे, मेघानंद जाधव, रवींद्र गवई, विनोद आघाव, संतोष अंभोरे, अविनाश सावंत, अनिल जाधव, प्रकाश उजगरे, ऋषिकेश कांबळे, आकाश खंदारे, सुनील वाघमारे, संतोष सिरसाट, रोहित जोगदंड, विशाल तुपसमुद्रे, नितीन हजारे, रवी इंगळे, नागेश सोनोने, चारुशीला डोंगरे, सुप्रिया सरकटे, प्रतिमा पवार, स्वाती अधोडे, प्रियांका सरकटे, रमा शेजुळ, प्रतिभा मगरे, सविता वेलदोडे, राजश्री वडमारे, प्रियंका डोंगरे, राजेश शेगोकार, स्वप्नील काळे, वाल्मिक वाघ, धनराज गोंडाने, संघपाल दिपके, संदीप हिवराळे, सुधा पवार आदींसह पीएच. डी संशोधक, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या