Cancel biometric attendance; Samyak's protest in the BAMU university on Monday
औरंगाबाद/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांसाठी लागु केलेल्या बायोमॅट्रिक हजेरीच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सोमवारी दि. 13 मार्च विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सकाळी 11ः30 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे हे करणार आहेत. बायोमॅट्रिक हजेरीसह संशोधकाला संशोधन केंद्रावर फक्त सहा महिन्यातुन एकदाच RAC ला बोलाविण्यात यावे, बार्टी, सारथी, महाज्योती आणि इतर फेलोशीफ धारक विद्यार्थ्यांना संशोधक केंद्र प्रगती अहवालासाठी तसेच कव्हरिंग लेटर (अनावरण पत्र) देण्यास टाळाटाळ करणा-या संशोधन केंद्राची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, संशोधक विद्यार्थ्यांची संशोधन केंद्राद्वारे होणारी पिळवणूक तत्काळ थांबविण्यात यावी, संशोधन केंद्रामध्ये संशोधक विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, २०२२-२०२३ पेट परिक्षा जाहिरात लवकर प्रसिद्ध करावी, जनसंवाद आणि वृत्तपत्रविभागात आंतरविद्याशाखेचे संशोधन मार्गदर्शक संशोधक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात यावे आदी मागण्यांसह हे आंदोलन करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या