वंचित बहुजन युवा आघाडी : संविधानवादी तरुणाईचा प्लॅटफॉर्म

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन युवा आघाडी : संविधानवादी तरुणाईचा प्लॅटफॉर्म

आंबेडकरी चळवळ ही विद्रोही तरुणांच्या संघर्षाने कायम फुलत आलेली आहे.. युवकांच्या मेहनतीतुन, आधुनिक कल्पकतेतून विविध टप्प्यावर आपण मोठं मोठे आव्हाने पेलून तडीस लावली आहे. ही तरुणाईची ताकद आगामी काळातील आंबेडकरी चळवळीच्या राजकीय पटलावर परिवर्तनाचा भाग झालेला आपणास पहावयास मिळणार आहे. त्यामुळे आंबेडकरी, संविधानवादी तरुणांनी आपली ताकद ओळखून संयम बाळगत आपली ऊर्जा संविधान बचाव च्या लढ्यात द्यावी असे वाटते. याबाबतची मांडणी करणारा सागर भवते यांचा लेख.....




वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्या प्रमाणे राज्यातील 169 घराण्यातील सत्ता लोकशाहीची गळचेपी करत आहे. त्यामुळे 169 घराण्यांचे राजकारण संपुष्टात आणून  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली संविधानिक व्यवस्था, सत्ता, सामाजिक न्याय तळागाळातील समूहापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी तरुणांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे..



आंबेडकरी समूहातील अनेक तरुण आजही काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, मनसे सारख्या घराणेशाहीचा खुलेआम पुरस्कार करणाऱ्या पक्षात घुटमळत आहे.. जे पक्ष घराणे टिकवण्यासाठी कुणाचाही बळी द्यायला आता तयार आहे. ते आता कार्यकर्त्यांना कुठलीही संधी देण्याच्या मानसिकतेत नाही.  त्यांना त्यांची राजकीय घराणेशाही टिकवणे आज रोजी महत्वाचे वाटते तेव्हा कार्यकर्त्यांनी आपले हक्काचे ठिकाण ओळखणे गरजेचे आहे.. नितीमुल्य हरवून बसलेल्या नेत्यांकडून उद्याच्या उज्वल भविष्याची अपेक्षा न करता आपली सामजिक गरज लक्षात घेत भारतीय संविधानाला प्रमाण मानणाऱ्या समस्त तरुणाई ने वंचित बहुजन युवा आघाडी सोबत येऊन वंचित समूहाच्या सामाजिक लढ्यात सहभागी व्हावे.. 



महाराष्ट्राच्या राजकारणात युवकांची राजकीय ताकद ओळखणारा जर कुठला पक्ष असेल तर तो फक्त वंचित बहुजन आघाडी आहे. युवकांना फक्त सभा, संमेलने, निवडणुका या मध्येच सामावून न घेता पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणून निर्णय घेण्याचे अधिकार देत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सद्याच्या तरुणांवर मोठा विश्वास टाकलेला आहे.. 2018 मधील भंडारा- गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत मी स्वतः 1 महिना त्याभागात राहून काम केले असताना तरुणांबद्दलची पक्षाची भूमिका जवळून समजून घेतली. तेव्हाची पूर्ण निवडणूकच बाळासाहेबांनी तरुणांच्या खांद्यावर टाकली होती. आणि संपूर्ण यंत्रणा सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्हयातील एकत्र आलेले तरुण सांभाळत होते. आणि तरुणांचा उत्साह वाढविण्यासाठी खुद्द सुजात साहेब आंबेडकर स्वतः मैदानावर उतरून बारीक सारीक बाबी पाहत होते. आंबेडकरी घराण्याचा वारस सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे निवडणुकीत राबतो आहे. नियोजन करतो आहे हे माझ्या सारख्या तरुणाने पाहून आपली गरज आंबेडकरी चळवळीला आहे हे ओळखले.  भंडारा- गोंदिया लोकसभा पोटनिवडणुक ही आमच्या साठी एक कार्यशाळा होती. 



सद्या महाराष्ट्राच राजकारण तरुण होत आहे तेव्हा प्रत्येक पक्षाने आपापल्या घरातील ठेवणीतले अस्त्र बाहेर काढले असताना उपेक्षित समूहासाठी झगडणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आंबेडकरी कुटुंबात युवराज असताना मायक्रो ओबीसी प्रवर्गातून आलेल्या अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे सारख्या छोट्याशा तालुक्यात आपले राजकीय अस्तिव जमवू पाहणाऱ्या निलेश विश्वकर्मा यांच्या सारख्या मातीशी इमान राखणाऱ्या पहेलवान, कबड्डीपटू तरुणाला वंचित बहुजन आघाडीचे वतीने राज्याच्या राजकिय आखाड्यात उतरवून घराणेशाहीच राजकारण करणाऱ्यांना चपराक दिली आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी निलेशभाऊ विश्वकर्मा यांच्या खांद्यावर टाकत पक्षाने लढवलेल्या सर्व निवडणुकांमध्ये तरुणांवर विशेष जबाबदारी देऊन विश्वास टाकत वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. ज्या तरुणाला या देशातील संवैधानिक व्यवस्था, नीती, मूल्ये कायम राहावी असे वाटते त्या समस्त तरुणाईला संविधान बचाओ चा लढा बुलंद करण्यासाठी व सर्वसामान्य उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचा मजबूत प्लॅटफॉर्म तुम्हाला साद घालतोय.. काळाची पाऊले ओळखून आपण वंचितांच्या संवैधानिक लढ्यात सहभागी व्हावे हीच सदिच्छा...!     


सागर भवते

वरखेड, तिवसा

मो.9850528687

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या