कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ; 'वंचित' कडून सागर भवते

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ; 'वंचित' कडून सागर भवते

अमरावती जिल्ह्यातील तिवसा ग्राम पंचायत मतदार संघ अनुसूचित जाती प्रवर्गातून कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने सागर भवते यांनी (दि. ४ एप्रिल रोजी) आपला नामांकन दाखल केला आहे.

अमरावती/प्रतिनिधी - सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक करिता वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर भवते यांनी तिवसा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक करिता ग्रामपंचायत मतदार संघातून आज रोजी नामांकन दाखल केले.

तिवसा तालुक्यातील सामाजिक चळवळीमध्ये सागर भवते विद्यार्थी दशेपासून सक्रिय असून वंचित बहुजन आघाडीच्या विविध पदांवर त्यांनी काम  केले आहे. सागर भवते पक्ष विस्ताराच्या दृष्टीने केलेली बांधणी व तालुक्यातील दांडगा जनसंपर्क सोबतच युवा चेहरा म्हणून असलेली ओळख यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ग्रामपंचायत मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे.

सागर भवते यांचे नामांकन अर्ज दाखल करतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे हितचिंतक तथा मार्गदर्शक सिध्दार्थजी भोजने, वंचित बहुजन युवा आघाडीचे तिवसा तालुका अध्यक्ष सचिन जोगे, युवा आघाडी अमरावती ता.अध्यक्ष मयुरेश इंगळे, मारडा ग्रा.पं. सरपंच रविना अंबुरे, ग्रा.प. सदस्य सिद्धार्थ कटारने, युवा आघाडी तिवसा ता. महासचिव अमोल जवंजाळ, अंकुश अंबुरे, मनिष खरे, आकाश बागडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या