वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा महासचिवपदी तिवसा तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते सागर भवते यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमरावती/प्रतिनिधी - तिवसा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे सक्रिय युवा कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे सागर भवते यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या अमरावती जिल्हा महासचिव पदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या पत्रानुसार राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी ही निवड जाहीर केली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडी राज्य कार्यालय येथून नव्यानेच युवा आघाडीची जिल्हा कार्यकारीणी घोषित करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष पदी अभिजित देशमुख तथा जिल्ह्यातील आक्रमक तथा आंदोलक युवकांचा कार्यकारीणी मध्ये समावेश करण्यात आला आहे. तिवसा तालुक्यातील सागर भवते यांची जिल्हा महासचिव पदी निवड झाल्याने संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सागर भवते हे विद्यार्थी दशेपासून ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी विचाराने प्रभावित असून त्यांना 2009 मध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन, 2015 मध्ये भारिप बहुजन महासंघ तिवसा तालुका अध्यक्ष, 2018 मध्ये पुन्हा तिवसा तालुका अध्यक्ष, 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, 2021 मध्ये पुन्हा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पक्षाचे वतीने जबाबदारी देण्यात आली होती. सागर भवते यांनी तिवसा तालुक्यात केलेला पक्षाविस्तार, जनसंपर्क तथा नगरपंचायत निवडणूक मध्ये मिळवलेला विजय, ग्रामीण भागात पक्षाचे वतीने सरपंच, सदस्य निवडून आणत वंचित बहुजन आघाडीचा राजकीय दबाव निर्माण केला होता. त्यांच्या कार्याची दखल घेत युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी सागर भवते यांची जिल्हा महासचिव पदी निवड केली आहे.
त्यांच्या निवडी बद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ भोजने, युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष सचिन जोगे, न. प. सभापती माधुरी पुसाम, सरपंच रविना अंबुरे, उपसरपंच संगीता नागदिवे, ग्रा.प. सदस्य राहुल मनवर, विनोद खाकसे, वंदना दहाट, सह मुस्ताक शहा, माजी सैनिक सुरेश उईके, डॉ. धर्मेंद्र दवाळे, ऍड. विकास तुरकाने, जेष्ठ कार्यकर्ते दादाराव गडलिंग, गुणवंत ढोणे, भूजंगराव वावरे, ता. संघटक संजना खाकसे, मनीष खरे, प्रफुल खाकसे, अमोल जवंजाळ, महेश दहाट, प्रवीण निकाळजे, शैलेश रामटेके, पंकज वाघमारे, राजकुमार आसोडे, मिलिंद खाकसे, अवी चव्हाण, प्रीतम मनवर, पूर्वेश विघ्ने, विलास मसलदी, सागर गोपाळे, देवेश मेश्राम, गौतम मेश्राम, राहुल ढोणे, भूषण राऊत, पंकज कांबळे, वैभव मंडळे, प्रफुल वासनिक सह आदींनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या