आंदोलनाचा ५२ वा दिवस ; प्रशासनाला जाग कधी येईल
मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फेलोशिप दिली जाते. शैक्षणिक वर्ष २०२१ च्या ८६१ पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी यासाठी राज्यभरातील पीएचडी संशोधक विद्यार्थी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत. परंतु आंदोलनाचा आज ५२ व दिवस उजळला तरीसुद्धा प्रशासनाने या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेतलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यंत जर संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण करू, असा इशारा विद्यार्थी नेते रवींद्र गवई यांनी दिला आहे.
"सोशल २४ नेटवर्क"शी बोलताना गवई म्हणाले की, दि. २० फेब्रुवारी पासून आम्ही सर्व संशोधक विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलन करीत आहोत. शासनाकडे इतर बाबीवर खर्च करण्यासाठी हजारो रुपयांचा निधी उपलब्ध आहे. परंतु संशोधन करणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पात्र असूनही फेलोशिप देण्यासाठी निधी नाही. शासनाची भूमिका अनुसूचित जाती विरुद्ध असून १४ एप्रिल पर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषणाचा मार्ग निवडावा लागणार आहे.
0 टिप्पण्या