तरूणांनो, रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज व्हा ; अ‍ॅड. सर्वजीत बनसोडे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तरूणांनो, रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज व्हा ; अ‍ॅड. सर्वजीत बनसोडे

स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न 


छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - नुसत्या पदव्या मिळवून आपल्या समस्या सुटणार नाहीत. सरकार, मीडिया बेरोजगारीवर बोलायला तयार नाही. तरूणांमध्ये बेरोजगारी विरोधात प्रचंड चिड निर्माण झाली आहे, ती व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या न्याय हक्कासाठी तरूणांनी आता रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज झाले पाहिजे, असे प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते अ‍ॅड. सर्वजीत बनसोडे यांनी केले.  ते दि. 6 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी व पदव्युत्तर संशोधक समितीच्या वतीने आयोजित समतेचे युवा पर्व भीमोत्सव 2023 अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमातुन बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनचे संचालक रफिक शेख हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन द विनर्स करिअर अकॅडमीचे संचालक बाळासाहेब शिंदे, डॉ. सुरेश शेळके, अ‍ॅड. पंकज बनसोडे, डॉ. धनंजय रायबोले, डॉ. निलेश आंबेवाडीकर, प्रा. प्रकाश इंगळे, अविनाश सावंत आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणारे तुषार बोडखे यांना लोकनेते भय्यासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने आणि सपना खरात यांना महाकवी वामनदादा कर्डक गायन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्रकाश इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन अमरदीप वानखडे यांनी केले तर आभार रोहिदास जोगदंड यांनी मानले. 


युनिव्हरसिटी आयडॉल स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद

समतेचे युवा पर्व भीमोत्सवामध्ये दि. 4 आणि 5 एप्रिल रोजी युनिव्हरसिटी आयडॉल प्रथम, द्वितीय आणि तृतीय फेरी घेण्यात आली. पहिल्या फेरीसाठी 100 हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता तर अंतीम फेरीमध्ये 10 स्पर्धकांमध्ये जोरदार चुरस पहायला मिळाली. स्पर्धेचा निकाल आणि बक्षिस वितरण दि. 14 एप्रिल रोजी विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात मा. कुलगुरूंच्या हस्ते होईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या