भीमोत्सव आयोजित नाट्य महोत्सवाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
पुढे बोलतांना शितोळे म्हणाले की, तरूणांनी जात, धर्म बाजुला सारून राष्ट्राच्या विकासामध्ये आपले योगदान देण्यासाठी पुढे आले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने समाजाशी आपला व्यवहार बंधुभावाने केला पाहिजे. मी देशासाठी काय करतो? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडला पाहिजे. गेल्या 10 वर्षापासून विद्यापीठात संशोधक विद्यार्थ्यांद्वारे घेण्यात येत असलेल्या भीमोत्सवाच्या आयोजनाबाबत त्यांनी संयोजन समितीचे कौतुक केले. सिद्धार्थ शिंगारे यांनी नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी विपुल भोले दिग्दर्शित हिय्या या नाटकाचे सादरीकरण झाले. सामाजिक आशय असलेल्या या नाटकाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. नागसेन वानखडे यांनी केले तर आभार सुयश नेत्रगांवकर यांनी मानले.
आजचे कार्यक्रम (दि. 9 ऑगस्ट 2023)
नाट्यमहोत्सवाच्या दुस-या दिवसाचे उद्घाटन जेष्ठ सामाजिक नेत्या मंगलताई खिवंसरा यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जेष्ठ रंगकर्मी डॉ. दिलीप महालिंगे हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. पुष्पा गायकवाड, निरंजन मगरे, कुणाल राउत, डॉ. प्रविण रणविर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी लेखक राजेश ढाबरे आणि डॉ. भावना ढाबरे दिग्दर्शित ‘पुणे करार’ तसेच शांताबाई कांबळे लिखित आणि योगेश सोनम दिग्दर्शित ‘माझ्या जन्माची चित्तरकथा’ या दोन नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
भीमोत्सव-2023 चा 10 एप्रिल रोजी समारोप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी व पदव्युत्तर संशोधक समितीच्या वतीने आयोजित भीमोत्सव 2023 चा दि. 10 एप्रिल 2023 रोजी समारोप होणार आहे. या समारोपीय सत्रामध्ये प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व नाटककार अनिलकुमार साळवे, वाणिजय व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरोदे, अॅड. पंकज बनसोडे, वंशवराज मंगरूळे, सतीश गायकवाड, प्रा. प्रकाश इंगळे, अविनाश सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी नितीन गायकवाड प्रस्तुत ‘प्रबुद्ध भीम भास्करा’ संगीत व नाट्य अविष्कार कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या