डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भीमोत्सवाचे आयोजन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भीमोत्सवाचे आयोजन

समतेचे युवा पर्व भीमोत्सव - २०२३ मध्ये उद्यापासून विविध कार्यक्रमाची रेलचेल

औरंगाबाद/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी व पदव्युत्तर संशोधक समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समतेचे युवा पर्व भीमोत्सव -२०२३ (वर्ष ११) चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन दि. ३ एप्रिल २०२३ रोजी सायं. ६:३० वाजता कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मनिषाताई तोकले यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वाल्मिक सरवदे, शुभांगी वाघचौरे, अमित भुईगळ, सुनील मगरे, किशोर थोरात, संजय पवार, भीमोत्सवाचे मुख्य निमंत्रक प्रा. प्रकाश इंगळे, भीमोत्सव समिती २०२३ चे अध्यक्ष अविनाश सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये विधी - ऍड. सुनील मगरे, ऍड. संघपाल भारसाखळे, ऍड. पंकज बनसोडे. सामाजिक - विजय जाधव, सुशीला खडसे, गणेश पंडित. पत्रकारिता- विद्या गावंडे, तुषार बोडखे, संतोष धुरंधर. नाट्य - अशोक कानकुडे, चरण जाधव शिक्षण - डॉ. हमराज उईके, डॉ. क्षमा खोब्रागडे. गायन - सपना खरात. उद्योग - किरण जगताप. प्रशासन - भारत निकाळजे, राज पंडित. वैद्यकीय - अविनाश सोनवणे. फुले-आंबेडकरी कार्यकर्ता - प्रकाश धुंदले, कुणाल खरात. साहित्य - विष्णु जाधव. संशोधन - डॉ. बालाजी मुळीक आदींचा समावेश असणार आहे.

दि. ४ एप्रिल रोजी युनिव्हर्सिटी आयडॉल प्रथम फेरीचे उद्घाटन ज्येष्ठ आंबेडकरी गायक नागसेनदादा सावदेकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉ. श्याम सिरसाट तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुणाल खरात, दत्ता भांगे, डॉ. सुनील निकम, ऍड. एस. आर. बोदडे, सुभाष राऊत, गोविंद देशमुख उपस्थित राहणार आहेत. दि. ५ एप्रिल रोजी युनिव्हर्सिटी आयडॉल द्वितीय व अंतिम फेरीचे उद्धाटन कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्या हस्ते होणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रा. भारत सिरसाट तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राम चव्हाण, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. गजानन सानप, सुदाम चिंचाने, मेघानंद जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोहित गांगुर्डे यांच्या भीमगीताचा कार्यक्रम होणार आहे.

दि. ६ एप्रिल रोजी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर अबुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनचे प्रमुख राऊफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. शिबिराचे उद्घाटन ऍड. सर्वजित बनसोडे करतील. वक्ते म्हणून डॉ. सुरेश शेळके, डॉ. योगिता तौर, डॉ. धनंजय रायबोले, डॉ. निलेश आंबेवाडीकर आदी उपस्थित राहतील. 

दि. ७ एप्रिल रोजी प्रकुलगुरु डॉ. श्याम सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरी विद्रोही कविसंमेलन होणार आहे. उदघाटन प्रसिद्ध कवयित्री अंजली दीक्षित-पंडित या करणार आहेत. तर सहभागी कवी म्हणून ज्ञानेश्वर बडगर महाराज, नारायण पुरी, ध. सु. जाधव, देवानंद पवार, रामप्रसाद वाव्हळ, डॉ. दिनेश सुरडकर, सुनील उबाळे, समाधान दहिवाळ उपस्थित राहणार आहेत.

दि. ८ एप्रिल रोजी नाट्य महोत्सवाचे उद्घाटन डॉ. जयंत शेवतेकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यस्थानी डॉ. किशोर शितोळे असतील तर पाहुणे म्हणून डॉ. व्ही. के. खिल्लारे, विपीन वाकेकर, डॉ. अंकुश कदम, संदीप सिरसाट उपस्थित राहणार आहेत. यावेळी अचानक आणि उन्हाच्या कटाविरुद्ध या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. नाट्यमहोत्सवाचे दुसरे पर्व दि. ९ एप्रिल रोजी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दिलीप महालिंगे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. उद्घाटन ज्येष्ठ महिला नेत्या मंगल खिवांसरा असतील. पाहुणे म्हणून पुष्पा गायकवाड, निरंजन मगरे, कुणाल राऊत, डॉ. प्रवीण रणवीर उपस्थित राहतील. यावेळी माझ्या जन्माची चित्तरकथा, पुणे करार या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. भीमत्सवाचा समारोप दि. १० एप्रिल रोजी  डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या अध्यकशतेखाली होईल. उद्घाटक म्हणून लेखक तथा दिग्दर्शक प्रा. अनिलकुमार साळवे हे करतील यावळी डॉ. मुस्तजीब खान, ऍड. पंकज बनसोडे, वंशावराज मंगरुळे, सतीश गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी नितीन गायकवाड प्रस्तुत 'प्रबुद्ध भीम भास्करा' संगीत व नाट्य आविष्कार कार्यक्रम होणार आहे. सर्व कार्यक्रम विद्यापीठाच्या मुख नाट्यगृहात साय. ६:३० ला सुरू होतील.

यादरम्यान क्रिकेट, प्रश्नमंजुषा, गोळाफेक, बुद्धिबळ, हॉलीबॉल, बॅटमिंटन, वक्तृत्व, काव्यवाचन, रांगोळी, पेंटिंग, १०० मीटर धावणे आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सात दिवस साजऱ्या होणाऱ्या या भीमोत्सवाला विद्यार्थी-विद्यार्थिनींनी, शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या