'कंठूळी' पुस्तकास 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

'कंठूळी' पुस्तकास 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार

समतेचे युवा पर्व भीमोत्सव- २०२३ कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रा. विष्णू जाधव यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

औरंगाबाद/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी व पदव्युत्तर संशोधक समिती आयोजित समतेचे युवा पर्व भीमोत्सव - २०२३ च्या वतीने देण्यात येणार 'अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार' प्रा. विष्णू जाधव यांच्या 'कंठूळी' या पुस्तकास नुकताच प्रदान करण्यात आला.

विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात (दि. ३ एप्रिल रोजी) त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुले-आंबेडकर विद्वत सभेचे मा. जिल्हाध्यक्ष प्रा. भारत सिरसाट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा ऊसतोड कामगार नेत्या मनिषाताई तोकले, रमाई यांच्या भाची शुभांगी वाघचौरे, भीमोत्सवाचे मुख्य निमंत्रक प्रा. प्रकाश इंगळे, भीमोत्सव समिती -२०२३ चे अध्यक्ष अविनाश सावंत आदी उपस्थित होते. 

रमाई प्रकाशन, औरंगाबाद प्रकाशित 'कंठूळी' या पुस्तकातून प्रा. विष्णू जाधव यांनी भटक्या विमुक्त समाजाचे ज्वलंत प्रश्न मांडून प्रस्तापित साहित्यिकांना चपराक दिली आहे. गतवर्षी या पुस्तकाचे प्रकाशन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या