औरंगाबाद: ०७ एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा काँग्रेस कमिटी कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने, गांधीभवन, शहागंज औरंगाबाद येथे डॉ. अरुण शिरसाट यांच्या संयोजनातून महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे., तरी या कार्यक्रमाला माजी मंत्री डॉ. नितीनजी राऊत साहेब यांची उपस्थिती असणार आहे.
फुले भीमोत्सवाच्या निमित्ताने आल्यानंतर राऊत साहेब आपल्या भाषणातून माजी खासदार राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या भाजपा चा समाचार घेतील अशी शक्यता आहे.
0 टिप्पण्या