समतेचे युवा पर्व भीमोत्सव - 2023 चे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - भारतीय संसदेला नवा पर्याय म्हणुन धर्मसंसद निर्माण केल्या जात आहे, भारतीय संविधानाला पर्याय म्हणुन मनुस्मृती लागू करण्यासाठी संविधानावर दररोज हल्ले चढवले जात आहेत, लोकशाही मानणारे जर आज या विरोधात उभे राहीले नाही तर देशाची वाटचाल पुन्हा एकदा गुलामीकडे झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा उसतोड कामगार संघटनेच्या प्रणेत्या मनिषाताई तोकले यांनी केले.
त्या (दि. 3 एप्रिल रोजी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी व पदव्युत्तर संशोधक समितीच्या वतीने आयोजित समतेचे युवा पर्व भीमोत्सव -2023 कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुले-आंबेडकर विद्वत सभेचे मा. जिल्हाध्यक्ष प्रा. भारत सिरसाट हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन मातोश्री रमाई यांच्या भाची शुभांगी वाघचौरे, भीमोत्सवाचे मुख्य निमंत्रक प्रा. प्रकाश इंगळे, भीमोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश सावंत आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना मनिषा तोकले म्हणाल्या की, संघर्ष, त्याग आणि बलिदानाच्या बळावर आंबेडकरी चळवळ उभी आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अवलंबल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. विषमतावादी दररोज समताधिष्ठित समाजव्यवस्थेची मूल्ये पायदळी तुडवित आहेत. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
प्रा. भारत सिरसाट बोलतांना म्हणाले की, संघर्ष हाच आंबेडकरी विचार आहे. केवळ जिंदाबाद, मुर्दाबाद म्हटल्याने चळवळी होत नाहीत. आजपर्यंत अनेक संघर्ष होतांना आपण पाहिले आहेत. संविधान वाचविण्यासाठीचा संघर्ष आपल्याला पुर्ण ताकदीनिशी उभा करावयाचा आहे. हा संघर्ष उभा करीत असतांना स्वतःपासून सुरूवात झाली पाहिजे. संविधान वाचवायचे असेल तर संविधान जगता आले पाहिजे.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी पुरस्कार अॅड. सुनील मगरे, अॅड. संघपाल भारसाखळे, अॅड. पंकज बनसोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार विजय जाधव, सुशीला खडसे, गणेश पंडित, लोकनेते भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विद्या गावंडे, दै. दिव्य मराठी, तुषार बोडखे, दै. महाराष्ट्र टाईम्स, संतोष धुरंधर, झुंझार लेखणी, प्राचार्य म. भि. चिटणीस नाट्य पुरस्कार चरण जाधव, अशोक कानगुडे, शैक्षणिक क्रांती पुरस्कार डॉ. हमराज उईके, डॉ. क्षमा खोब्रागडे, महाकवी वामनदादा कर्डक गीतगायन पुरस्कार सपना खरात, महात्मा जोतीराव फुले युवा उद्योजक पुरस्कार किरण जगताप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार भारत निकाळजे (पीएसआय), राज पंडित (पीएसआय), आद्य शल्य चिकित्सक जिवक पुरस्कार डॉ. अविनाश सोनवने, प्रा. अविनाश डोळस फुले-आंबेडकरी कार्यकर्ता पुरस्कार प्रकाश धुंदले, डॉ. कुणाल खरात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट संशोधक पुरस्कार डॉ. बालाजी मुळीक, लोकशाहीर अण्णाभाउ साठे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रा. विष्णु जाधव आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन अमरदीप वानखडे यांनी केले तर आभार संतोष अंभोरे यांनी मानले.
आजचे कार्यक्रम - युनिव्हरसिटी आयडॉल प्रथम फेरी
अध्यक्ष - डॉ. श्याम सिरसाट, प्रकुलगुरू
उद्घाटक - नागसेनदादा सावदेकर, जेष्ठ गायक
पाहुणे -
दत्ता भांगे, व्यवस्थापन परिषद सदस्य
डॉ. कुणाल खरात, प्रदेशाध्यक्ष एमआयएम विद्यार्थी आघाडी
डॉ. सनिल निकम, व्यवस्थापन परिषद सदस्य
अॅड. एस. आर. बोदडे, जेष्ठ विधिज्ज्ञ
सुभाष राउत, अधिसभा सदस्य
गोविंद देशमुख, अधिसभा सदस्य
दि. 5 एप्रिलचे कार्यक्रम
युनिव्हरसिटी आयडॉल द्वितीय व अंतिम फेरी
अध्यक्ष - प्रा. भारत सिरसाट
उद्घाटक - डॉ. भगवान साखळे, कुलसचिव
पाहुणे -
डॉ. राम चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य
डॉ. कैलास अंभुरे, प्राध्यापक, मराठी विभाग
डॉ. गजानन सानप, व्यवस्थापन परिषद सदस्य
प्रा. सुदाम चिंचाणे, अभ्यासक
मेघानंद जाधव, भीमशाहीर
मोहित गांगुर्डे यांचा भीमगितांचा कार्यक्रम
0 टिप्पण्या