MAHAJYOTI | पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला 'सम्यक'चा पाठिंबा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

MAHAJYOTI | पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला 'सम्यक'चा पाठिंबा


आर्थिक कोंडीतून संशोधकांना सोडवा

संशोधक विद्यार्थ्यांनी फेलोशिप मिळणार म्हणून तासिका तत्वावरील तसेच कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक नियुक्त्या हाती असतांना त्या सोडून पुर्णवेळ संशोधनाला सुरूवात केली. नोंदणी नोव्हेंबर २०२१ च्या सुमारास झालेली असतांना १ नोव्हेंबर २०२२ पासून फेलोशिप देण्याचा अन्यायकारक निर्णय झाला त्यामुळे आता पाच नव्हे चारच वर्षे विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळू शकणार आहे. एक वर्षाचे आर्थीक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी नोंदणी दिनांकापासून फेलोशिपची मागणी आहे. संशोधक विद्यार्थ्यांची सरकारने आर्थीक कोंडीकेली असून या कोंडीतून सोडवण्याची मागणी आहे. 

- बळीराम चव्हाण, राज्य अध्यक्ष, महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - महाज्योती संस्थेकडून पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून छात्रवृत्ती (फेलोशिप) मिळण्यासाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीतर्फे समाज कल्याण कार्यालयासमोर सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाने पाठींबा दिला आहे.  



सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मा. प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश दादाराव इंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा पत्र दिले. यावेळी विनोद आघाव, नितीन हजारे, वाल्मीक वाघ, सुरेश नेत्रगावकर, सागर धोडपकर, सीमा कदम आदी उपस्थित होते. 



महाज्योती संस्थेने १ मे २०२२ रोजी काढलेल्या जाहीरातीनुसार  महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी १५३९ अर्ज प्राप्त झालेले होते. प्राप्त झालेल्या अर्जाची व मूळ कागदपत्रांची तपासणी महाज्योतीकडून नागपुर येथे १ ते ९ सप्टेंबर २०२२ रोजी झाली. त्यात १२२६ अर्ज पात्र ठरवण्यात आले. महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या १ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत १२२६ पात्र उमेदवारांना १ नोव्हेंबर २०२२ या या मंजूर दिनांकापासून अधिछात्रवृत्तीचा निर्णय झाला. पहिली दोन वर्षे ३१,००० रूपये प्रति महिना सोबत एचआरए व आकस्मिक खर्च, त्यापुढील तीन वर्षे ३५,०००रुपयांसोबत एचआरए व आकस्मिक खर्च देण्याचा निर्णय घेवून १३ डिसेंबर २०२२ रोजी अवार्ड लेटर दिले. जानेवारी २०२३ महिन्या अखेर पहिल्या दोन महिन्याचे मानधन मिळेल असे महाज्योती कार्यालयाकडून स्पष्ठ करण्यात आले होते. मात्र, मार्च महिना सरला अद्याप विद्यार्थ्यांना फेलोशिपची रक्कम अदा झाली नाही. बार्टी, टार्टी या संस्थेकडून विद्यापीठाच्या नोंदणी दिनांकापासून फेलोशिप दिली जात असल्याने महाज्योतीकडून सुद्धा नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी. यासंदर्भात मुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री, यांच्यासह विविध मंत्री, व्यवस्थापकीय संचालक मंडळाला वेळोवेळी निवेदने दिली. आंदोलने केली त्याला केराची टोपली दाखवली गेल्याने विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून विविध विद्यार्थी संघटना, विद्यापीठाच्या अधिकार मंडळावरील पदाधिकारी, तज्ज्ञांनी कृती समितीच्या मागणीला पाठींबा दर्शविला आहे. असे निवेदनात म्हटले आहे. बाळू चव्हाणस, विद्यानंद वाघ, जयश्री भावसार, सविता गायकवाड, अश्विनी कसुरे आदी विद्यार्थी उपोषणाला बसले असून बळीराम चव्हाण, सोमनाथ चाैरे, अंकुश सोनवणे, राम पारखे, अमित कुटे, महेंद्र मुंडे, लंका मंडावत , शारदा शेळके, जयश्री भावसार, जयश्री भुस्कुटे, मीरा गायके आदींसह पन्नासहून अधिक विद्यार्थी उपोषणस्थळी उपस्थित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या