वंचितचे सागर भवते यांच्या प्रचाराचा शुभारंभ

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वंचितचे सागर भवते यांच्या प्रचाराचा शुभारंभ

सुशिक्षित युवक बाजार समितीत पाठवण्याचे अभिजित देशमुख यांचे आवाहन.

अमरावती/प्रतिनिधी - तिवसा तालुक्यात होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणूक करिता ग्रामपंचायत मतदारसंघातून वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी उमेदवारी दाखल केली असून प्रचाराचा शुभारंभ कुऱ्हा येथून करण्यात आला.

       


युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा भगवान गौतम बुद्ध यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर काही विशिष्ट लोकांनी कब्जा मिळवला असून त्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे देणे घेणे नाही त्यामुळे प्रस्थपितांची मक्तेदारी मोडीत काढत  सुशिक्षित युवा नेतृत्व सागर भवते यांना बाजार समिती मध्ये पाठवण्याचे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी केले. 





कुऱ्हा येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी  आयोजित  बैठकीत सागर भवते यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये निवडून आणण्याचा निर्धार उपस्थित ग्रा प  सदस्य तथा कार्यकर्त्यांनी केला. 



यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ भोजने, मारडा ग्रा.प. सरपंच रविना अंबुरे, ग्रा.प. सदस्य बाबाराव राऊत, विनोद खाकसे, राहुल मनवर, वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका महासचिव अमोल जवंजाळ, उपाध्यक्ष भूषण राऊत, अंकुश अंबुरे,भुषण राऊत, योगेश कांबळे, राजेश इंगळे, सारंग तेलमोरे, राजकुमार राऊत, नमो राऊत सह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या