महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्यावतीने संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी या मागणीसाठी १७ एप्रिल पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष बळीराम चव्हाण यांनी "सोशल२४नेटवर्क"शी बोलताना सांगितले.
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - ओबीसी, भटक्या विमुक्त व इतर विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहे. संस्थेचे मुख्य मूळ दोन हेतू आहेत. एक संशोधन प्रक्रिया आणि दुसरे म्हणजे प्रशिक्षण परंतु महाज्योती संस्था प्रशिक्षनावरती अधिक भर देते. संशोधन या घटकाला मात्र दुय्यम मानले गेल्यामुळे अनेक संशोधक विद्यार्थ्यांची मागील तीन ते चार वर्षांमध्ये आर्थिक नुकसान होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या बार्टी व टार्टी या दोन्ही संस्था त्या-त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अधिछात्रवृति देताना विद्यापीठाच्या नोंदणी दिनांकापासून दिले जाते. मात्र महाज्योती ही संस्था संचालक मंडळांनी मान्यता दिलेल्या दिनांक पासून या संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृति देतात. त्यामुळे हा संशोधक विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय आहे. या अन्यायाच्या विरोधात एल्गार म्हणून आमरण उपोषण करण्याचे ठरविण्यात आले आहे. हे उपोषण करण्यापूर्वी महाज्योती संस्था व पोलीस प्रशासनास माहितीस्तव निवेदन सादर करण्यात आली.
या प्रसंगी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष बळीराम चव्हाण सदस्य रामेश्वर मुळे, बाळू चव्हाण, सोमनाथ चौरे, विजय धनगर, शाम कातकडे, पवार आकाश, सखाराम आव्हाड, पंढरी गाडे, संजय राठोड, केदार अमृता, जयश्री भुस्कुटे, ज्योती कसुरे, विद्या नजान, सारिका माळी, प्रतिभा पवार, अश्विनी कसुरे, रामदास गोरे, ज्ञानेश्वर पवार, अंकुश राठोड, बाळासाहेब वायाळ हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या