डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवी व पदव्युत्तर संशोधक समिती आयोजित समतेचे युवा पर्व - "भीमोत्सव - २०२३" द्वारा घेण्यात आलेल्या युनिव्हर्सिटी आयडॉल स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या पालि & बुद्धिझम विभागातील एम. ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी अनुमती सिद्धार्थ तिडके यांना तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात (दि. १४ एप्रिल रोजी) आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले, ज्येष्ठ विचारवंत एम. आर. कंबळे (सोलापूर), कुलसचिव प्रा. डॉ. भगवान साखळे, प्रकुलगुरु प्रा. डॉ. श्याम सिरसाट, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. वाल्मिक सरोदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान, समतेचे युवा पर्व भीमोत्सव समितीचे मुख्य निमंत्रक प्रा. प्रकाश इंगळे, भीमोत्सव - २०२३ समितीचे अध्यक्ष अविनाश सावंत आदी उपस्थित होते.
या यशाबद्दल त्यांचे प्रा. भारत सिरसाट, डॉ. रेखा मेश्राम, अमरदीप वानखडे, प्रबुद्ध सिरसाट, शंकर मेश्राम, बेबीनंदा पवार, रमा लहाळे, सीमा कदम, अनिल दिपके, अण्णासाहेब सोनवणे, सागर धोडपकर, राजेश वानखडे, प्रिती मेश्राम, वर्षा पानपाटील, प्रिती बोर्डे, लता कंबळे, भाग्यश्री इंगळे, रुपाली, राजेश शेगावकर, एड. नागसेन वानखडे, रवींद्र गवई आदींनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या