वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या डॉ. अंजली आंबेडकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती पुस्तकाचे लेखक डॉ. संजय मून यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - रमाई प्रकाशन, औरंगाबाद प्रकाशित आणि डॉ. संजय मून लिखित
"अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकारण:प्रचार व अपप्रचार" या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ बुधवार, दि.17 मे 2023 रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र, टिव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर, येथे सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात बहुजन हिताय बहुजन सुखाय राजकारण करीत असणारे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकिय भुमिकांबद्दल नेहमीच विविध प्रकारे चर्चा होत असते. या चर्चेचा मागोवा घेणा-या या ग्रंथाचे प्रकाशन वंचित बहुजन आघाडीच्या जेष्ठ नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते होणार असून या ग्रंथावर सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक प्रा. जयदेव डोळे आणि जेष्ठ पत्रकार व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता प्रा. मंगल खिवंसरा हे भाष्य करणार आहेत.
या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थीत रहावे, असे आवाहन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अध्ययन संस्था, बोधीसत्व प्रतिष्ठान, प्रा. अविनाश डोळस प्रतिष्ठान आणि फुले-आंबेडकर विद्वत सभा औरंगाबाद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या