बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढता प्रभाव थोपविण्यासाठी अपप्रचाराचे षडयंत्र - प्रा. अंजली आंबेडकर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढता प्रभाव थोपविण्यासाठी अपप्रचाराचे षडयंत्र - प्रा. अंजली आंबेडकर

रमाई प्रकाशित प्रकाशित व डॉ. संजय मुन लिखित एड. बाळासाहेब आंबेडकर : प्रचार व अपप्रचार पुस्तकाचे प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर - एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अपप्रचारात परकीयांपेक्षा स्वकीय आघाडीवर असून बीएसपी, बामसेफ पक्ष-संघटनांनी बाळासाहेबांवर व्यक्तिगत व कौटुंबिक टीका केली आहे, करीत आहेत. या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची बुद्धिजीवी वर्गावर मोठी जबाबदारी असून डॉ. संजय मून व रमाई प्रकाशनने ही जबाबदारी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या स्वीकारल्याबद्दल आनंद होत असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. अंजलीताई आंबेडकर यांनी केले.

त्या काल (दि. १७ मे रोजी) मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित रमाई प्रकाशन औरंगाबाद प्रकाशित आणि डॉ. संजय मून लिखित "एड. प्रकाश आंबेडकर : प्रचार व अपप्रचार" या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होत्या. 

पुढे बोलतांना प्रा. आंबेडकर म्हणाल्या की, पारंपरिक आंबेडकरवादी नसलेले समूह आज बाबासाहेब स्वीकारत आहेत, आंबेडकरी विचारधारेशी जुळू पाहत आहेत. मुस्लिम बांधव एका हाती संविधान आणि एका हाती बाबासाहेबांचा फोटो घेऊन आंदोलन करीत आहे, हे परिवर्तन आम्ही स्वीकारणार आहोत की नाही? असा सवाल त्यांनी यावेळी केला. ज्या-ज्या वेळी बाळासाहेब आंबेडकर यांचा राजकारणातील प्रभाव वाढू लागला त्या-त्या वेळी अपप्रचार केला. राजकीय व्यक्तीची बदनामी करणे ही त्या व्यक्तीला राजकारणातून संपविण्याची शेवटची पातळी आहे. अर्बन नक्षलवादाच्या मुद्द्यावरून बाळासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्यात प्रसारमाध्यमांचाही वाटा असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

प्रास्ताविकात बोलताना डॉ. मुन म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपाला, बदनामीला उत्तर देण्याची क्षमता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हावी, सत्य निर्भीडपणे मांडता यावे यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली. या पुस्तकाचा फुले-आंबेडकरी राजकारण सक्षम होण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा हा प्रयत्न आहे. 

प्रा. जयदेव डोळे बोलतांना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दलित समाजाविषयीचे धोरण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर बाळासाहेब आंबेडकर यांच्या विविध भूमिकांमधून जाणवते. आजोबा आणि नातू यांच्या विचारांमध्ये एकसूत्रता, एकमत असलेले हे एकमेव उदाहरण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या समताधिष्टीत समाजव्यवस्था निर्मितीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व राजकीय योगदान अत्यंत महत्वाचे आहे. बदनामी, अपप्रचार होतच राहीला परंतु बाळासाहेबांनी भूमिका बदलली नाही, वंचित बहुजनांचे नवे राजकीय समीकरण मांडले.

मंगल खिवंसरा बोलतांना म्हणाल्या की, डॉ. संजय मुन यांनी अपप्रचार करणाऱ्यांना उघडं पडण्याचे काम केले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी सडलेल्या डबक्यांच्या राजकारणाचे बांध फोडून टाकले. बाळासाहेबांच्या राजकारणाने ज्यांची मतपेटी फुटली त्यांनी आपरोपाच्या फैरी झाडल्या. आपलं नेतृत्व टिकून राहावं याची चिंता बाळासाहेबांनी कधी केली नाही, भूमिकेशी एकनिष्ठ राहिले म्हणून आज ते राष्ट्रीय राजकारणात ओळखल्या जातात. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाई प्रकाशनचे संचालक प्रा. भारत सिरसाट यांनी केले आभार डॉ. प्रज्ञा साळवे यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या