रमाई प्रकाशन प्रकाशित आणि अॅड. एकनाथ रामटेके लिखित ‘भारतातील अस्पृश्यतेचे सामाजिक तापमान’ पुस्तकाचे प्रकाशन
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - संशोधनाचा दर्जा वाढविणारे, संशोधनात्मक मांडणी करणारे मोजके लेखक सद्या लेखन करतांना दिसतात त्यामध्ये अॅड. एकनाथ रामटेके यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कारण त्यांनी या पुस्तकातुन संशोधनात्मक पद्धतीने केलेली मांडणी नव्या संशोधकांसमोर आदर्श निर्माण करणारी आहे. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले रामटेके हे ख-या अर्थाने संशोधक आहेत, असे गौरोद्गार ज्येष्ठ पत्रकार प्रा. बाबा गाडे यांनी काढले.
ते शनिवारी दि. 3 मे रमाई प्रकाशन प्रकाशित आणि अॅड. एकनाथ रामटेके लिखित ‘भारतातील अस्पृश्यतेचे सामाजिक तापमान’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी मौलाना आझाद संशोधन केंद्रात आयोजित कार्यक्रमातुन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाल निशान पक्षाचे नेते कॉ. भीमराव बनसाडे हे होते. विचारमंचावर भन्ते सुदत्तबोधी, आयआरएस अधिकारी अरविंद सोनटक्के, लेखक अॅड. एकनाथ रामटेके, लिलाबाई रामटेके, रमाई प्रकाशनचे संचालक प्रा. भारत सिरसाट, अॅड. डी. आर. शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी अरविंद सोनटक्के बोलतांन म्हणाले की, अॅड. एकनाथ रामटेके लिखित पुस्तक बाबासाहेबांच्या क्रांतीला मदत करणारे आहे. संविधानाने अस्पृश्यता नष्ट केली असली तरी आजही अस्पृश्यता पाळले जाते. कायद्याचे पालन केल्या जात नाही यासाठी कृतिशिल कार्यक्रम आखण्याची गरज आहे.
अध्यक्षीय समारोप करतांना कॉ. बनसोड म्हणाले की, अस्पृश्यता म्हणजे जातीयता नव्हे. म. गांधी अस्पृश्य निवारण करणारे असले तरी ते जातीयतेच्या विरोधात नव्हते. बाबासाहेब स्वीकारले परंतु त्यांचे विचार आजही आचरणात येत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रास्ताविक रमाई प्रकाशनचे संचालक प्रा. भारत सिरसाट यांनी केले. सूत्रसंचालन अमरदीप वानखडे यांनी केले तर आभार डॉ. वैशाली रामटेके यांनी मानले.
यावेळी डॉ. रेखा मेश्राम, अॅड. प्रशांत रामटेके, कमलाकर तायडे, रविंद्र मेश्राम, सी. के. रामटेके, अॅड. दिपाली मेश्राम, रेखा रामटेके, डॉ. वैशाली तायडे, धनराज गोंडाणे, पंडितराव तुपे, डॉ. ह. नी. सोनकांबळे, डॉ. धनंजय रायबोले, सुरडकर साहेब, गंगाबाई सुरडकर, भीमराव गाडेकर, शंकर मेश्राम, बेबीनंदा पवार, प्रविण हिवराळे आदींसह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या