माजी मंत्री डॉ.नितीनजी राऊत साहेबांचे कट्टर
डॉ.अरुण शिरसाट हे माजी मंत्री व नागपूर चे आमदार डॉ.नितीनजी राऊत साहेबांचे ते कट्टर समर्थक म्हणून शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वपरिचित आहेत. ते काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्षे झाली यशस्वी पणे काम करीत आहेत, त्यांना पक्षाच्या कामाचा अटप व कामाची पद्धत सुद्धा शहरात उल्लेखनीय आहे.
शिरसाट यांचेवर शहरातील पक्षश्रेष्ठी खुश
पक्षाचे नेते शहराध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची दाट अपेक्षा आहे की, डॉ.अरुण भाऊ शिरसाट यांना औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मिळावी.
शिरसाट हे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळख
आमदार म्हणून शिरसाट धडाडीने काम करून मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असणार आहेत असा विश्वास मतदार व कार्यकर्ते यांना आहे.
प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी
राजकारण दुय्यम स्थानावर ठेऊन सामाजिक चळवळीत हिरीरीने सहभागी होणारे कार्यकर्ते म्हणून डॉ.अरुण शिरसाट यांचा नावलौकिक आहे, मग महिलांच्या संदर्भातील प्रकरणे असो, विद्यार्थी-प्राध्यापक यांच्या समस्या असो, शाळकरी मुलांचे प्रश्न असो, वस्तीत भेडसावणारे पाण्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न आदी व सर्वच क्षेत्रात प्रश्न कसे सुटतील यासाठी आंदोलने, मोर्चे, निवेदने, रस्ता रोको, ठिय्या आंदोलने मध्ये ते अग्रस्थानी असल्याचे संपूर्ण शहराला माहिती आहे.
सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व डॉ.अरुण भाऊ शिरसाट
हक्काचा माणूस म्हणून शिरसाट यांच्याकडे बघितले जाते मग तो लहान कार्यकर्ता असो व जेष्ठ पदाधिकारी असो भाऊ त्यांना सामावून घेण्यासाठी तयार असतात.
अश्या सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्वाला आमदारकीचे।तिकीट देण्यात काही वावगे नाही असा सूर काँग्रेस आणि संपूर्ण शहरात आहे.
0 टिप्पण्या