बायोमेट्रीक बंद करा, सम्यकच्या नेतृत्वात शेकडो संशोधक विद्यार्थ्यांचा विद्यापीठात भव्य मोर्चा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बायोमेट्रीक बंद करा, सम्यकच्या नेतृत्वात शेकडो संशोधक विद्यार्थ्यांचा विद्यापीठात भव्य मोर्चा

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मा. प्रदेश महासचिव डॉ. प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला, या मोर्च्यामध्ये ५००० ते ६०० संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.



छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - पीएच. डी संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना लागू करण्यात आलेली बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी (आज दि. 9 ऑक्टोंबर रोजी) सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मा. प्रदेश महासचिव डॉ. प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात शेकडो संशोधक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गेट ते विद्यापीठ मुख्य इमारतीपर्यंत असा भव्य मोर्चा काढला. मोर्चामध्ये 500-600 पीएच. डी संशोधक विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. मोर्चेक-र्यांच्या घोषणांनी विद्यापीठाचा संपूर्ण परिसर दणाणुन गेला.



यावेळी करण्यात आलेल्या मागण्या: Ph.D संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यापीठ व संशोधन केंद्राला लावलेल्या बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्यात यावे, प्राध्यापक भरतीच्या तत्काळ मुलाखती घेवून भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, Ph.D संशोधकांना संशोधनासाठी उपयुक्त साहित्य उपलब्ध करून देणे, Ph.D संशोधकांना ग्रंथालयात संगणक व इंटरनेटची सुविधा Unlimited उपलब्ध करून द्यावी, नवीन PET ची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी, लंच होम मध्ये R/O फिल्टर बसवण्यात यावे, रीडिंगच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र जेवण्यासाठी योग्य सोय करण्यात यावी, भरमसाठ वाढलेल्या Ph.D च्या प्रोग्रेस रिपोर्टच्या फीस कमी करण्यात याव्या, पीएच. डी करणा-या विद्यार्थ्यांना लेक्चर घेण्याची लावलेली सक्ती रद्द करण्यात यावी.


 
यावेळी सम्यकचे जिल्हाध्यक्ष पवन साळवे, अनिल दिपके, नितीन हजारे, अनिल वाघ, विशाल तिडके, एड. नागसेन वानखेडे, प्रकाश उजगरे, सुनील वाघमारे, जोतिका मलवार, शारदा शेळके, सीमा पैठणकर, निशा, पूजा गजहंस, शाहीर मेघानंद जाधव, सचिन भुईगळ, हर्षपाल खाडे, भूषण चोपडे , वाल्मिक वाघ, गजानन गवई, संतोष अंभोरे, सागर धोडपकर, सुनील वाघमारे,  हर्षवर्धन कांबळे, दिग्विजय शिंदे, सतिश कांबळे, अरविंद भुक्तर, प्रकाश पट्टेकर, अमरदीप वानखडे, नालंदा वाकोडे, राजरत्न वाकोडे आदींसह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पीएच. डी संशोधक विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या
विद्यापीठाचे कुलगुरू आज उपलब्ध नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रकुलगुरू डॉ. श्याम सिरसाट यांना निवेदन सादर केले. सुरूवातीला प्रकुलगुरूंनी कुलगुरू आल्यानंतर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगताच आंदोलनकर्त्यांनी आजच निर्णय घ्या, अशी भूमिका घेतली. मुख्य इमारतीसमोर शेकडो विद्यार्थी-विद्यार्थीनींनी ठिय्या दिलेला लक्षात घेत प्रकुलगुरूंनी तोंडी आश्वासन दिले. मात्र आंदोलनकर्त्यांनी लेखी द्यावे असा आग्रह धरल्यामुळे अखेर प्रकुलगुरूंनी लंचब्रेकनंतर लेखी स्वरूपात आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले.



अन्यथा 16 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण
प्रकुलगुरूंनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मा. प्रदेश महासचिव डॉ. प्रकाश इंगळे यांनी दि. 16 ऑक्टोंबर पर्यंत मागणी मान्य झाली नाही तर स्वतः आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या