लोकसभा निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्रातील तीन चाकी सरकारमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
मुंबई/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागा वाटपावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी एकिकडे इंडिया आघाडीच्या नावाखाली कॉंग्रेसने विरोधकांची मोट बांधायला सुरूवात केली असतांनाच आता एनडीएमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील भाजपा, राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेगटामध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
माध्यमांशी खा. राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, शिवसेना शिंदे गट लोकसभेमध्ये 22 जागांवर खासदार निवडुन आणण्याच्या तयारीत आहे. उर्वरित जागेसंदर्भात भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी चर्चा करून निर्णय घेतल्या जातील, असं ते यावेळी म्हणाले.
0 टिप्पण्या