प्रा. अविनाश डोळस सर स्मृतिदिनाच्या निमित्ताने...

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. अविनाश डोळस सर स्मृतिदिनाच्या निमित्ताने...

दि. 11/11/ 2018 भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांसाठी दुःखद दिवस.. आजही हा दिवस विसरता येत नाही.. अख्ख्या महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक बीजारोपण करणारे, प्रा.अविनाश डोळस सर यांची वैचारिक दिशेने धडाडणारी तोफ आज शांत झाली.. संपूर्ण राज्यातील कार्यकर्ता वैचारिक अंगाने पोरका झाल्यासारखे वाटत होतं. स्मृतिशेष डोळस सरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!



प्रा. डोळस सर यांनी भारिप बहुजन महासंघला दिलेले योगदान मोठे आहे.  संपूर्ण राज्यात आपल्या अभ्यासपूर्ण वाणीतुन पक्षाला ध्येय, उद्दिष्ट आणि दिशा देत कार्यकर्त्यांची एक पिढी घडनवार विद्यापीठ म्हणजे प्रा. डोळस सर.. सरांच्या या विद्यापीठातील मला विद्यार्थी होता आलं हेच माझ्या कार्यकर्ता असल्याचे मी प्रमाणपत्र मानतो..!


भारिप बहुजन महासंघाचे अनेक चढ उतार पाहिलेला एक चिकित्सक, अभ्यासू वक्ता म्हणून डोळस सरांना अनेकदा अमरावती मध्ये ऐकण्याची संधी मिळाली. प्रभावी मांडणीतुन समोरच्याला कामाला लावण्याचे उत्कृष्ट कसब अंगी असलेले डोळस सर 2016 मध्ये अमरावती येथील मनपा टाऊन हॉल भारिप बहुजन महासंघच्या कार्यकर्ता मेळाव्या करिता आले असताना त्यांनी त्यांच्या भाषणातून फक्त वक्ता म्हणून भाषण न देता त्यांनी कार्यकर्त्यांना एक कृती कार्यक्रम देत आधी अख्या हॉल मधील कार्यकर्त्यांना नाव गाव पत्ता विचारला आणि प्रत्येकाला आपापल्या तालुक्यात काय काम करायचे याबाबतीत सूचना दिल्यात आणि सांगितले की, मी परत एक महिन्याने येतोय परत याच ठिकाणी भेटूया.. काही कार्यकर्त्यांनी काम केले तर काहींना वाटले की सर कशाला येतील आता..जाऊद्या.. परंतु वेगळेच घडले पुढील एक महिन्याच्या आधीच कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा असा कार्यक्रम वरिष्ठांनी लावायला सांगितला आणि अक्षरशः प्रा. डोळस सर प्रमुख मार्गदर्शक होते. बोलल्या प्रमाणे परत एक महिन्याने सर पुन्हा अमरावती आले आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या कामाचा आढावा घेतला.. फक्त भाषण देऊन टाळ्या घेणारा नाही तर सामान्य कार्यकर्त्याना कृती कार्यक्रम देऊन त्यांना समाजासमोर घडवणारे डोळस सर मी पाहिलेत आणि अनुभवलेत याचा मला अभिमान आहे.



जून 2018 मध्ये सम्यक  विद्यार्थी आंदोलनाचे राज्यस्तरीय  शिबीर गोवा येथे ठेवण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली. 3 दिवस चाललेल्या या शिबिरात शेवटच्या दिवशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रा. डोळस सरांनी 2 तास राजकीय प्लॅटफॉर्म उभा करण्याची दिशा दिली. आणि शेकडो विद्यार्थी तेथून नवी ऊर्जा घेऊन निघाले होते. त्याच शिबिराच्या समारोप नन्तर सर्वांचा उत्साह वाढविण्यासाठी समुद्रात जहाजाने फिरण्याचा आनंद घेण्यासाठी डोळस सर आम्हा सर्वांसोबत सहभागी झाले होते. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळून त्यांना आपलंसं करणारे एक विचारवंत म्हणून त्यांनी कधी आपले वेगळेपण दिसू दिले नाही. पक्षाच्या व स्वतःच्या कुठल्याही विपरित परिस्थितीत पक्षाला न विसरण्याचे धडे डोळस सरांनी दिल्यामुळे आज सरांच्या विचारांची शिदोरी जवळ ठेवूनच माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते राज्यभरात कार्यरत असतील यात शंका नाही.


आज डोळस सरांचे जुने फेसबुक अकाउंट चेक केले असता जून 2018 ला गोवा येथील राज्यस्तरीय शिबीरानंतर एक आठवण म्हणून आद. बाळासाहेबांच्या समवेत एक फोटो डोळस सरांनी त्यांचे फेसबुक अकाउंट वरून शेअर केला होता आणि त्या फोटोत मी दिसतोय हेच माझ्यासाठी कोट्यवधी रुपयांचे समाधान आहे.


आपल्या वैचारिक प्रगल्भतेमधून भारिप बहुजन महासंघ जमिनीवर टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरणा देणार विद्यापीठ प्रा. अविनाश डोळस सर यांच्या आज स्मृतिदिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने स्मृतीस विनम्र अभिवादन..!


- सागर भवते

जिल्हा महासचिव,

वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या