बायोमेट्रीक हजेरी रद्द करा ; डॉ. प्रकाश इंगळे यांचे आजपासून आमरण उपोषण

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बायोमेट्रीक हजेरी रद्द करा ; डॉ. प्रकाश इंगळे यांचे आजपासून आमरण उपोषण

 छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांना सक्तीची करण्यात आलेली बायोमेट्रीक हजेरी रद्द करण्यात यावी, प्रोग्रेस रिपोर्टचे वाढविण्यात आलेले भरमसाठ शुल्क कमी करण्यात यावे या मागणीसाठी विद्यार्थी नेते डॉ. प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांनी आजपासून दि. 2 नोव्हेंबर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. 


विद्यार्थी नेते डॉ. प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात बायोमेट्रीक रद्द करा या प्रमुख मागणीसाठी दि. 9 ऑक्टोंबर रोजी पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांनी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला होता. लेखी आश्वासनानंतरही विद्यापीठ प्रशासनाने प्रश्न न सोडविल्यामुळे अखेर आज पासून आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरील निवेदन मा. कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रक यांना देण्यात आले. परंतु दिवसभरामध्ये विद्यापीठ प्रशासनाकडुन कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या