तिवसा तालुक्याला यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचे उद्दिष्ट द्या, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केली आहे.
अमरावती/प्रतिनिधी - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा याकरिता यशवंतराव चव्हाण घरकुल आवास योजना सुरू करण्यात आली परंतु तिवसा तालुक्याला अद्यापही सदर योजनेचे उद्दिष्ट प्राप्त नसल्याने हजारो लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहणार का असा प्रश्न उपस्थित करत तिवसा तालुक्याला यशवंतराव चव्हाण घरकुल आवास योजनेचे उद्दिष्ट उपलब्ध करून द्यावे अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी प्रादेशिक उपसंचालक समाजकल्याण विभाग यांचे कडे केली आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल बेघर घटकांना हक्काचे पक्के घरकुल मिळावे याकरिता शासनाने यशवंतराव चव्हाण घरकुल योजना सुरू केली परंतु सदर योजनेचे पंचायत समिती स्तरावर उद्दिष्ट प्राप्त नसल्याने ही योजना पांढरा हत्ती ठरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. धनगर, भोई, भटके सह इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल समूहाचा समावेश यशवंतराव चव्हाण घरकुल आवास योजना करिता करण्यात आला असून तिवसा पंचायत समितीचे वतीने तीनशे चे वर प्रस्ताव समाजकल्याण विभाग कडे मंजुरी करिता पाठवले असल्याचे समजते परंतु शासनाकडून सदर योजने करिता उद्दिष्ट प्राप्त नसल्याने तिवसा तालुक्यातील शेकडो लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहत आहे. त्याकरिता तिवसा तालुक्याला यशवंतराव चव्हाण घरकुल आवास योजनेचे उद्दिष्ट उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी प्रादेशिक उपसंचालक समाजकल्याण विभाग अमरावती यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन सादर करतेवेळी फुले आंबेडकर विद्वत सभा जिल्हा समन्वयक सिद्धार्थ भोजने, जिल्हा उपाध्यक्ष रिना गजभिये, शहर उपाध्यक्ष विनय बांबोळे, तालुका महासचिव अमोल जवंजाळ, प्रसिध्दी प्रमुख रोषण गजभिये, प्रशांत गजभिये, मयुरेश इंगळे, अजय रामटेके, अमोल मेश्राम सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चांदुर बाजार पं. स. ला उद्दिष्ट तर तिवस्याला का नाही - सागर भवते
यशवंतराव चव्हाण घरकुल आवास योजनेचे जिल्हयातील चांदुर बाजार व अचलपूर तालुक्याला उद्दिष्ट प्राप्त असल्याची माहिती आहे तेव्हा तिवसा तालुक्यातील लाभार्थ्यांवर अन्याय का ? शासनाच्या या भेदभावामुळे शेकडो कुटूंब घरकुल योजनेपासून वंचित राहू शकतात तेव्हा तिवसा तालुक्याला सदर योजनेचे उद्दिष्ट प्राप्त करून द्यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे वतीने समाजकल्याण कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सागर भवते यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या