डॉ. सचिन बोर्डे यांना पीएच. डी गाईडशिप
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - महात्मा गांधी कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. सचिन पुंजराम बोर्डे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच. डी संशोधक मार्गदर्शक म्हणून नुकतीच निवड केली आहे.
डॉ. बोर्डे हे शिक्षणशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्यांचे सामाजिक चळवळीत योगदान आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या